Crime News : बापच बनला वैरी! ‘रील्स’ बनवणा-या टेनिसपटू मुलीवर जन्मदात्याने झाडल्या गोळ्या, जागीच मृत्यू

मुलीच्या सोशल मीडियावरील व्हिडिओ पोस्ट करण्याच्या सवयीमुळे वडील नाराज.
gurugram crime news tennis player radhika murdered father shot her
Published on
Updated on

एकीकडे संपूर्ण जगात सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या विम्बल्डन या टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेची चर्चा सुरू असून, प्रसिद्ध व्यक्तींपासून ते सामान्य चाहत्यांपर्यंत सर्वांचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे. मात्र, अशातच भारतातील टेनिस विश्वातून एक मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे.

भारतातील एका युवा टेनिसपटूची हत्या करण्यात आली आहे. गुरुग्राम येथे राहणाऱ्या राधिका यादव या टेनिसपटूची तिच्या घरातच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या हत्येचा आरोप तिच्या वडिलांवरच असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

gurugram crime news tennis player radhika murdered father shot her
National Commission for Women | नाशिकमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या शोषण प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल

या कारणामुळे केली हत्या, वडील पोलिसांच्या ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील गुरुग्राम येथील सुशांत लोक फेज-2 या उच्चभ्रू वसाहतीमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे. असे सांगितले जात आहे की, 25 वर्षीय टेनिसपटू राधिका हिच्यावर तिच्या वडिलांनीच घरात गोळ्या झाडल्या, ज्यात तिचा मृत्यू झाला. ही घटना सोसायटीतील फ्लॅट क्रमांक E-157 मध्ये घडली, जिथे हे कुटुंब बऱ्याच काळापासून राहत होते. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रकरण समोर येताच गुरुग्राम पोलिसांनी तातडीने कारवाई करण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू केला आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि रील्स हे या हत्येमागील कारण असल्याचे सांगितले जात आहे. आरोपी वडील आपल्या मुलीच्या सोशल मीडियावरील व्हिडिओ पोस्ट करण्याच्या सवयीमुळे अत्यंत नाराज होते आणि याच रागातून त्यांनी आपल्या मुलीचा जीव घेतला, अशी चर्चा आहे.

gurugram crime news tennis player radhika murdered father shot her
Bengaluru Crime: बंगळुरात रस्त्यावरुन चालणाऱ्या महिलांचे 45 व्हिडिओ, इन्स्टावर होते 10 हजार फॉलोअर्स; विकृत तरुणाला अटक

अशी होती राधिकाची कारकीर्द

राधिका यादवला कोर्टवर फारसे यश मिळू शकले नाही. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडे (ITF) असलेल्या नोंदींनुसार, वरिष्ठ गटात (सीनियर लेव्हल) राधिकाने केवळ 3 व्यावसायिक सामने खेळले होते आणि त्या सर्वांमध्ये तिला पराभव पत्करावा लागला होता. तर, कनिष्ठ गटात (ज्युनियर लेव्हल) तिने 1 सामना जिंकला होता, आणि 2 सामन्यांमध्ये तिला पराभव स्वीकारावा लागला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news