गुरुपौर्णिमेनिमित्त सदगुरू जग्‍गी वासुदेव यांचा खास संदेश; म्हणाले, "माझा आशीर्वाद..."  

मानवतेला आपले ज्ञान देऊ केले...
Sadhguru Jaggi Vasudev
गुरुपौर्णिमेनिमित्त सदगुरू जग्‍गी वासुदेव यांचा खास संदेशSadhguru Jaggi Vasudev 'X' Handle

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आध्यात्मिक गुरू आणि ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव ( Sadhguru Jaggi Vasudev ) यांनी गुरुपौर्णिमानिमित्त संदेश देत आशीर्वाद दिला आहे. त्यांनी आपल्या एक्स (X-Twitter) पोस्टमध्ये म्हटलं आहे, "१५,००० वर्षांहून अधिक वर्षांपूर्वी, आदियोगी-आदि गुरू यांनी मानवतेला आपले ज्ञान देऊ केले ज्यामुळे लोकांचे अस्तित्व आणि सृष्टीचा स्रोत समजून घेण्याच्या पद्धतीमध्ये मोठा बदल झाला." 

Summary
  • आज (दि.२१) गुरुपौर्णिमा, दरवर्षी आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला साजरी केली जाते.

  • गुरुपौर्णिमानिमित्त आध्यात्मिक गुरू सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी संदेश दिला आहे.

  • १५,००० वर्षांपूर्वी, आदियोगी, आदि गुरू यांनी मानवतेला आपले ज्ञान देऊ केले.

 गुरूपौर्णिमा (Gurupaurnima 2024)आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी  गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. यावर्षी रविवार, १३ जूलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जात आहे. या दिवशी आपल्या गुरुंचे पुजन केले जाते. या दिवशी व्यास जयंतीही साजरी केली जाते.

मानवतेला आपले ज्ञान देऊ केले...

आध्यात्मिक गुरू आणि ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी आपल्या एक्स अकाउंटवर गुरुपौर्णिमानिमित्त पोस्ट करत संदेश व आशीर्वाद दिला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "

१५,००० वर्षांहून अधिक वर्षांपूर्वी, आदियोगी, आदि गुरू यांनी मानवतेला आपले ज्ञान देऊ केले. ज्यामुळे लोकांचे अस्तित्व आणि सृष्टीचा स्रोत समजून घेण्याच्या पद्धतीमध्ये एक महत्त्वपुर्ण असा बदल झाला. त्यामुळे स्वतःला सृष्टीचा एक स्वतंत्र भाग आणि निर्मितीचा अंतिम स्त्रोत यांच्यातील माध्यम बनवले. ही माझी इच्छा आणि माझा आशीर्वाद आहे की तुम्ही या माध्यमाचा वापर स्त्रोतामध्ये प्रवेश करण्यासाठी कराल. आशीर्वाद." असं लिहित त्यांनी गुरुपौर्णिमा हा हॅशटॅग दिला आहे.  

Sadhguru Jaggi Vasudev
गुरुची कृपा तुमच्यावर आहे : सद्गुरु जग्गी वासुदेव Sadhguru Jaggi Vasudev 'X' Handle

गुरुची कृपा तुमच्यावर

आणखी एक ट्वीट करत सद्गुरु जग्गी वासुदेव म्हणत आहेत, "गुरुपौर्णिमा हा केवळ एक उत्सव नाही, ती उत्क्रांतीची वचनबद्धता आहे. तुम्ही तुमचे जीवन कसे अनुभवता ते तुम्ही ठरवले आहे. तुम्हाला परम मुक्तीची जाणीव होवो. गुरुची कृपा तुमच्यावर आहे. प्रेम आणि आशीर्वाद."

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news