Surat Building Collapsed : सुरतमध्ये सहा मजली इमारत कोसळली, 7 जणांचा मृत्यू

अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबले जाण्याची भीती
Surat Building Collapsed
गुजरातच्या सुरत शहरातील पाल भागात शनिवारी सहा मजली इमारत कोसळली.Twitter

पुढारी ऑनलाईन डेस्क : Surat Building Collapsed : गुजरातच्या सुरत शहरातील पाल भागात शनिवारी सहा मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबले जाण्याची भीती आहे. घटनास्थळी कालपासून एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक बचाव कार्य करत आहेत. दरम्यान, सुरतचे मुख्य अग्निशमन अधिकारी बसंत पारीक यांनी सांगितले की, रात्रभर चाललेल्या शोध मोहिमेत सात मृतदेह सापडले. पोलिसांनी सांगितले की, बचावकार्य सुरू आहे, अजूनही बरेच लोक आत अडकले असण्याची शक्यता आहे.

सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम गेहलोत म्हणाले, ‘एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीम अजूनही मदत आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत. इमारतीतील 5 फ्लॅटमध्ये लोक राहत होते. अनेक लोक ढिगा-याखाली अडकल्याची भीती आहे. येथील बहुतेक रहिवासी लोक परिसरातील कारखान्यांमध्ये काम करत होते. हे सर्वजण भाडे कराराने वास्तव्यास होते. ही जुनी इमारत होती, त्यामुळे ती अचानक कोसळली असल्याची शक्यता आहे. येथे पाच ते सात कुटुंबे जीव धोक्यात घालून राहत होती. या संपूर्ण इमारतीची मालक एक विदेशी महिला आहे. इमारत कोसळल्यानंतर जेव्हा बचावकार्य सुरू झाले तेव्हा आम्हाला अडकलेल्या लोकांच्या ओरडण्याचा आवाज आला. आम्ही एका महिलेला ढिगाऱ्यातून बाहेर काढले आणि तिला रुग्णालयात नेले. त्यानंतर एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news