गुजरातमधील पोरबंदर विमानतळावर तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले, ३ ठार

नियमित प्रशिक्षणादरम्यान अपघात
Chopper Crush
पोरबंदर विमानतळावर तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले, ३ ठार file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमधील पोरबंदर विमानतळावर भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर नियमित प्रशिक्षणादरम्यान कोसळले. या अपघातात दोन पायलटसह तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांकडून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.

रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला पोरबंदर विमानतळावर अपघात झाला. नेहमीप्रमाणे हेलिकॉप्टर प्रशिक्षणानंतर उतरत असताना हा अपघात झाला. लँडिंग दरम्यान हेलिकॉप्टर आग लागून कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिकांसह एकूण तिघेजण होते. तिघांनाही ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आणि गंभीर भाजलेल्या अवस्थेत पोरबंदर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news