गांधीनगर : गुजरातमध्ये गेल्या चार दिवसांत मुसळधार पाऊस व पुरामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांत 32 जणांचा मृत्यू झाला आहे. राजकोटसह अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा बंद होत्या. सौराष्ट्र आणि कच्छला अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा फटका बसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. शुक्रवारी चक्रीवादळ अधिकच तुफानी झाले होते. राजकोट, जामनगर, पोरबंदर, जुनागढ, द्वारका येथे मुसळधार पाऊस झाला.