Mumbai-Goa Highway | 97 प्रवाशांचा मृत्यू - ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

मुंबई-गोवा महामार्गाचे नित्कृष्ट दर्जाचे काम, राष्ट्रीय महामार्ग विभागाची तक्रार
Mumbai-Goa Highway Accident
97 प्रवाशांचा मृत्यू - ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाMumbai-Goa Highway
Published on
Updated on

रायगड : मुंबई-गोवा महामार्गाचे नित्कृष्ट दर्जाचे काम करणारे ठेकदार चेतक एंटरप्रायझेस कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेश कुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे व प्रकल्पावर काम करणारे नमूद कंपनीच्या इतर जबाबदार व्यक्ती यांच्या विरुध्द प्रकल्प अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांचे तक्रारीवरुन माणगाव पोलीस ठाणे येथे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे यांना अटक करण्यात आली आहे.

माणगाव पोलीस ठाणे हदिदतील इंदापूर ते वडपाले या 26.7 कि.मी.अंतराचा महामार्गाचे चौपदीकरणाचे काम केंद्र शासनाकडून मागविण्यात आलेल्या निविदाव्दारे चेतक इंटरप्राईजेस लिमिटेड आणि अ‍ॅपको इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीचे संयुक्त उपक्रमास 1 जून 2017 रोजी करार करुन 18 डिसेंबर 2017 रोजी पासून कंत्राट सुरु करण्यात आले होते. महामार्गाच्या आधुनिकीकरणाच्या कामासाठी आवश्यक असणा-या जागेपैकी सर्वसाधारणपणे 91.80 टक्के इतकी बोजारहित जागा शासनातर्फे हस्तांतरीत करण्यात आली होती. ठेकेदार यांचेकडून सदर काम दोन वर्षाच्या कालावधीत पुर्ण करावयाचे होते. सदर कालावधी संपल्यानंतरही मुदत वाढ मिळूनही ठेकेदार यांचेकडून सदर मुदत वाढ कालावधीत मासिक 10 टक्के यावेगाने काम पुर्ण न होता फक्त 4.6 टक्के यावेगाने काम झाले. ठेकेदार यास महामार्ग प्राधिकरणाकडून तीन वेळा कारणे दाखवा नोटीस देण्यात आली.

Mumbai-Goa Highway Accident
Mumbai-Goa highway : मुंबई-गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त

या दरम्यान कंत्राटदार यांच्याकडून करण्यात येत असलेल्या कामाचा दर्जा तपासून त्याने कामाचा योग्य दर्जा न राखता निकृष्ट दर्जाचे काम केल्याबाबत वेळोवेळी केंद्र शासनामार्फत सदर कामाच्या गुणवत्ता नियंत्रणावर देखरेख करण्यासाठी नियुक्त केलेल्या प्राधिकृत अभियंता, मे.ब्लूम एल.एल.सी., यु.एस.ए., शाखा महाड यांच्या मार्फतीने एन.सी.आर. देण्यात आलेले आहेत. तथापी नमूद कंत्राटदार यांच्या कामामध्ये काही सुधारणा झाल्याचे दिसून आले नाही.

चेतक एंटरप्रायझेस लिमीटेड (मे.चेतक प्को (जेव्ही)) (कॉन्ट्रॅक्टर), बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पश्चिम), मुंबई-51 यांनी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कि.मी. नंबर 84 ते कि.मी. या ठिकाणच्या इंदापूर ते वडपाले, जि.रायगड या भागातील महामार्गाच्या रुंदीकरण व आधुनिकीकरणाचे काम सुरु केले. परंतू त्यांनी सदरचे काम मुदतीत पुर्ण न करता दर्जाहिन काम केले व दर्जाहिन कामामुळे व अपुर्ण असलेल्या कामाच्या ठिकाणी महामार्गास पडलेल्या खड्डयांमुळे, तसेच काम पूर्ण झालेल्या ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना त्यामध्ये थर्मोप्लास्टीक पेंट (पांढ-या पट्टया), कॅट आईज, डेलीनेटर, वाहन चालकांच्या माहितीसाठीचे माहिती/सूचना फलक लावणे, अनधिकृत रस्ते दुभाजक बंद करणे आवश्यक होते तथापी त्यांनी ह्या उपाययोजना न केल्यामुळे नमूद महामार्गावरुन प्रवास करणा-या प्रवाशांना रस्त्याच्या अशा धोकादायक परिस्थितीची कोणतीही जाणीव व अंदाज न येता अपघात होऊन त्यामध्ये प्रवाशांची जिवीत व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येऊ शकते याची पुर्णपणे जाणीव असतांना देखील त्यांनी निष्काळजीपणा दाखवून वरीलप्रमाणे कामामध्ये पुर्तता न केल्याने सन 2020 पासून आजपावेतो वरील प्रमाणे नमूद एकूण 170 मोटार अपघात होण्यास व त्यामध्ये एकूण 97 प्रवाशांच्या मृत्यूस आणि एकूण 208 प्रवाशांना लहान-मोठया स्वरुपाच्या गंभीर व किरकोळ स्वरुपाच्या दुखापती होण्यास त्याचप्रमाणे अपघातग्रस्त वाहनांच्या मोठया प्रमाणावरील नुकसानीस कारणीभूत झालेले आहेत. म्हणून चेतक एंटरप्रायझेस लिमीटेड बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पश्चिम), मुंबई-51 या कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेश कुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे व प्रकल्पावर काम करणारे नमूद कंपनीच्या इतर जबाबदार व्यक्ती यांच्या विरुध्द प्रकल्प अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांचे तक्रारीवरुन माणगाव पो.ठाणे येथे गुन्हा भारतीय न्याय संहीता कलम 105, 125(अ)(ब) व 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे यांना अटक करण्यात आलेली आहे. पुढील अधिक तपास पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि बेलदार हे करीत आहेत.

97 प्रवाशांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर 97 प्रवाशांच्या मृत्यूस आणि एकूण 208 प्रवाशांना लहान-मोठया स्वरुपाच्या गंभीर व किरकोळ स्वरुपाच्या दुखापती होण्यास त्याचप्रमाणे अपघातग्रस्त वाहनांच्या मोठया प्रमाणावरील नुकसानीस कारणीभूत झालेले आहेत. म्हणून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

Mumbai-Goa Highway Accident
Sangali - Kolhapur Highway | कोल्हापूर-सांगली महामार्गाच्या 'चिंध्या'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news