Air India Ahmedabad plane crash | विमान अपघाताच्या घटनास्थळी डीव्हीआर सापडला, गुजरात ATS कडून तपास

विमान अपघाताच्या तपासात डीव्हीआर का आहे महत्त्वाचा?
Air India Ahmedabad plane crash
अहमदाबाद विमान अपघात.
Published on
Updated on

Air India Ahmedabad plane crash

गुजरात एटीएसने शुक्रवारी (१२ जून) अहमदाबादमध्ये क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या ढिगाऱ्यातून एक डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर (DVR) ताब्यात घेतला. "हा एक डीव्हीआर आहे, जो आम्ही क्रॅश झालेल्या विमानाच्या ढिगाऱ्यातून शोधून काढला आहे. एफएसएल पथक लवकरच येथे येईल." असे एटीएसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

विमान अपघाताच्या तपासात डीव्हीआर हा एक महत्त्वाचा घटक समजला जातो. जी विमानात बसवलेल्या कॅमेऱ्यांमधून व्हिडिओ फुटेज कॅप्चर करतो. तसेच ही प्रणाली डेटा संग्रहित आणि व्यवस्थापित करते. यामुळे तपास अधिकाऱ्यांना विमान अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या घटनांचा क्रम समजण्यास मदत होते.

Air India Ahmedabad plane crash
Ahmedabad plane crash : चमत्कार म्हणावा की आणखी काय? आगीनं अख्ख विमान वितळलं, पण भगवद्गीतेला साधी झळसुद्धा लागली नाही

अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान (AI171) गुरुवारी दुपारी एका मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले. या विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते.

या दुर्घटनेतून केवळ एक जण बचावला. तर २४१ जणांचा मृत्यू झाला. या विमानात १६९ भारतीय, ५३ ब्रिटन, ७ पोर्तुगाल आणि एका कॅनडाच्या नागरिकाचा समावेश होता. तर विमानात १२ क्रू मेंबर्स होते.

Air India Ahmedabad plane crash
Ahmedabad plane crash | मी मेलोय असेच वाटले... दोन एअर होस्टेस डोळ्यांदेखत होरपळल्या; विमान दुर्घटनेत बचावलेल्या रमेश यांची पहिली प्रतिक्रिया

पायलटनं 'मेडे कॉल' दिला, पण...

एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) च्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या विमानाने गुरुवारी दुपारी १:३९ वाजता अहमदाबाद विमानतळाच्या रनवे २३ वरून उड्डाण घेतले होते. विमानाने टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच पायलटने मेडे कॉल दिला आणि काही सेकंदात विमान कोसळले. 'मेडे' हा गंभीर आपत्कालीन परिस्थितीचा संकेत आहे.

पीएम मोदींची घटनास्थळी भेट

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विमान अपघातस्थळी भेट दिली. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत अहमदाबाद विमानतळावर उच्चस्तरीय आढावा घेण्यात आली.

पीएम मोदी यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले, "आज अहमदाबादमध्ये अपघातस्थळाला भेट दिली. घटनास्थळाचे दृश्य दुःखद आहे. त्यानंतर अथकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि पथकांना भेटलो. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्यासोबत आमच्या संवेदना आहेत."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news