नैसर्गिक आपत्तीच्या बातम्या दाखवताना तारीख, वेळ दाखवा; वाहिन्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे

IB Ministry guidelines | माहिती - प्रसारण मंत्रालयाची वाहिन्यांना मार्गदर्शक तत्त्वे
Wayanad Landslide Updates
केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनच्या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. Pudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: खासगी वृत्तवाहिन्यांना नैसर्गिक आपत्तीच्या बातम्या दाखवताना अनेक खबरदारी घ्यावी लागणार आहे. अशा बातम्या दाखवताना घटनेची तारीख आणि वेळही दाखवणे बंधनकारक असेल. घटनेची तारीख आणि वेळ न दाखवल्यास सरकार कारवाई करू शकते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

फुटेज खाली तारीख आणि वेळेचा उल्लेख नसतो.

दूरचित्रवाणी वाहिन्या नैसर्गिक आपत्ती आणि मोठ्या अपघातांच्या बातम्या अनेक दिवस सतत दाखवत असतात, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे मत आहे. त्याच्या फुटेजमध्ये घटनेच्या दिवशी घडलेली तीच जुनी दृश्ये दाखवण्यात येतात. त्यामुळे हे फुटेजही सध्याच्या काळातील असल्याचे प्रेक्षकांना वाटते. कारण अशा फुटेज खाली तारीख आणि वेळेचा उल्लेख नसतो. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये भीती आणि दहशत निर्माण होते.

प्रेक्षकांमध्ये भीती आणि दहशत

UPSC Delhi Coaching Centre Death | दिल्ली : यूपीएससी उमेदवारांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news