

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील ओल्ड टाउन पोलिस चौकीवर मंगळवारी रात्री ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा नुकसान झाल्याचे वृत्त नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Baramulla Grenade Attack)
सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी इतर सुरक्षा एजन्सींसह तात्काळ परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली आहे. शोध मोहिमेदरम्यान एक ग्रेनेड पिन जप्त करण्यात आली. या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. शोध मोहीम सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. (Baramulla Grenade Attack)
जम्मू आणि काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात एक गंजलेला टँकविरोधी भूसुरुंग सापडल्याची माहिती मिळताच बॉम्ब निकामी पथकाने ते नष्ट केले.