Solar Track Varanasi | वाराणसीत हरित रेल्वे क्रांतीची सुरुवात; देशातील पहिला ‘सोलर ट्रॅक प्रोजेक्ट’चा प्रारंभ

Solar Track Varanasi | रेल्वेच्या ट्रॅकमधील 70 मीटर अंतरावर बसवले सौर पॅनेल्स
Solar Track Project Varanasi
Solar Track Project Varanasi x
Published on
Updated on

India’s First Railway Solar Track Varanasi Solar Power Between Tracks

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघात असलेल्या वाराणसीमध्ये, भारतीय रेल्वेने देशातील पहिलं सौरऊर्जा प्रकल्प सुरू करून हरित ऊर्जा क्रांतीचा पाया घातला आहे. बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स (BLW) येथे ‘सोलर ट्रॅक प्रोजेक्ट’ या नावाने राबवण्यात आलेल्या या प्रायोगिक उपक्रमाने नवा इतिहास घडवला आहे.

या प्रकल्पाअंतर्गत रेल्वेच्या ट्रॅकमधील 70 मीटर अंतरावर सौर पॅनेल्स बसवण्यात आले असून, हे पॅनेल्स रेल्वे वाहतुकीला अडथळा न आणता वीज निर्मिती करतात. 28 स्वदेशी बनावटीच्या पॅनेल्स एकत्रितपणे 15 किलोवॉट पीक (KWp) क्षमतेची वीज निर्माण करतात.

ट्रॅकदरम्यान पॅनेल बसवण्याची अभिनव कल्पना

परंपरागतपणे सौर प्रकल्प छतांवर किंवा मोकळ्या भूखंडांवर बसवले जातात. मात्र, BLW च्या या नवकल्पनेत सौर पॅनेल्स थेट ट्रॅकच्या मध्ये बसवले आहेत. रबर माउंटिंग पॅड्स आणि इपॉक्सी अ‍ॅडहेसिव्हच्या सहाय्याने हे पॅनेल्स सुरक्षीतरीत्या ठेवलं गेले आहेत. त्यामुळे अतिरिक्त जमीन खरेदी करण्याची गरज पडलेली नाही.

Solar Track Project Varanasi
India China Boundry limitation | मोठी बातमी! भारत-चीन सीमारेषा निश्चितीचा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र येणार

तांत्रिक वैशिष्ट्ये

  • पॅनेल्सची लांबी: 2278 मिमी

  • रुंदी: 1133 मिमी

  • उंची: 30 मिमी

  • वजन: प्रत्येकी 31.83 किलो

  • प्रकार: बायफेशियल मोनो-क्रिस्टलाइन PERC सेल्स (दोन बाजूंनी सूर्यप्रकाश शोषून घेण्याची क्षमता)

  • उर्जा उत्पादन: प्रत्येकी सुमारे 602 Wp

  • मॉड्यूल कार्यक्षमता: 20-21%

  • ऊर्जा घनता: 240 KWp प्रति किमी

  • ऊर्जा निर्मिती क्षमता: 1 किमी ट्रॅकमधून दररोज सुमारे 960 युनिट्स

सुलभ देखभाल आणि लवचिक रचना

रेल्वेच्या सततच्या देखभाल गरजा लक्षात घेऊन, या पॅनेल्सना फक्त 90 मिनिटांत काढून पुन्हा बसवता येते. पॅनेल्स स्टेनलेस स्टील अ‍ॅलन बोल्ट्सने बसवले असून, गरजेवेळी सहजपणे निघू शकतात. धूळ व इतर घाण साचण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रचना विशेषतः डिझाईन केली गेली आहे.

भविष्यातील धोरण

भारतीय रेल्वेचे एकूण ऑपरेशनल ट्रॅक 1.2 लाख किमी असून, त्यापैकी यार्ड लाईन्स व निष्क्रिय ट्रॅकवर या प्रकल्पाची पुनरावृत्ती केल्यास देशभरात मोठ्या प्रमाणावर हरित ऊर्जा निर्माण होऊ शकते. BLW च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दर किमी 3.21 लाख युनिट्स वार्षिक वीज निर्माण होऊ शकते.

Solar Track Project Varanasi
Hangor submarine | चीनने पाकिस्तानला दिली तिसरी 'हंगोर' पाणबुडी; 8 सबमरीन्सचा करार, पाकच्या नौदलाची क्षमता वाढणार...

7 वर्षांचा पे-बॅक कालावधी

या सोलर प्रकल्पाचा खर्च अंदाजे 7 वर्षांत परत मिळेल आणि त्यानंतर अनेक वर्षे मोफत व स्वच्छ वीज उपलब्ध होईल. या योजनेमुळे भारतीय रेल्वेची वीज खर्चात बचत होणार असून, कार्बन उत्सर्जनातही लक्षणीय घट होणार आहे.

देशभरातील रेल्वेट्रॅकद्वारे सौरउर्जा...

BLW जनसंपर्क अधिकारी राजेश सिंह म्हणाले, “देशात पहिल्यांदाच सौर पॅनेल्स रेल्वे ट्रॅकच्या दरम्यान बसवले गेले आहेत. संपूर्ण प्रणाली स्वदेशी डिझाइन आणि तंत्रज्ञानावर आधारित आहे. यामुळे देशभरातील रेल्वे ट्रॅक्स सौर उर्जेच्या प्रवाहात बदलू शकतात.”

BLW चा हा सौर ट्रॅक प्रकल्प हे केवळ नवे तंत्रज्ञान नाही, तर भारतीय रेल्वेसाठी पर्यावरणपूरक व स्वावलंबी उर्जेच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. जर हा प्रकल्प देशभरात लागू केला गेला, तर भारताच्या रेल्वे मार्गांवर सौर ऊर्जा वाहिनी उभारणे शक्य होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news