Greater Noida Family Deaths: रात्री नूडल्स खाल्ले, सकाळी एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू; ग्रेटर नोएडातील घटनेने खळबळ

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामधील रबुपुरा परिसरातील नागला श्री पदम गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
Noodles
Noodles File Photo
Published on: 
Updated on: 

Greater Noida Family Deaths

ग्रेटर नोएडा : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामधील रबुपुरा परिसरातील नागला श्री पदम गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या तीन लहान मुलांचा समावेश आहे. या कुटुंबाने आदल्या रात्री नूडल्स खाल्ले होते. अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

महेश (वय ३७), त्याची पत्नी ललिता (वय ३५) आणि त्यांची मुले लड्डू (वय ११), मिष्टी (वय ७) व साक्षात (वय ३) अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी सकाळी या घटनेची माहिती रबुपुरा पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक पोलीस, वरिष्ठ अधिकारी, रुग्णवाहिका आणि अन्न सुरक्षा विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक टीम आणि पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. तसेच, वैज्ञानिक पुरावे गोळा केले.

Noodles
IT couple death: पत्नीच्या कपड्यांवर ‘आय लव्ह यू’ अन् बाजूला चिठ्ठी...; आयटी दांपत्याच्या मृत्यूपूर्वी नक्की काय घडलं?

रात्री नूडल्स खाल्ल्याची माहिती

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत शेजारी आणि महेश यांच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सर्व सदस्यांनी रात्री नूडल्स खाल्ले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाचही जण मृतावस्थेत आढळले. मृतांच्या तोंडातून फेस आल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, या लक्षणाचा मृत्यूच्या कारणाशी नेमका काय संबंध आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असली, तरी शवविच्छेदन अहवाल आणि अन्य वैज्ञानिक तपासण्या पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. वैद्यकीय आणि न्यायवैद्यक तपासणीतून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Noodles
Crime News: बटाट्याची भाजी वाढल्याने पती संतापला; पत्नीला चावा घेत डोक्यात दगड घातला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news