प. बंगालमध्‍ये माेठा रेल्‍वे अपघात : ८ प्रवासी ठार, २८ जखमी

: पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात मालगाडी कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला धडकली
: पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात मालगाडी कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला धडकली

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात मालगाडी कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला धडकली. रंगा पाणी आणि निजबारीजवळ झालेल्या अपघातात तीन बोगींचे मोठे नुकसान झाले. रेल्वेचे पथकाकडून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या अपघातात आठ प्रवासी ठार झाले असून २८ जण जखमी झाल्याचे वृत्त ANI न दिले आहे.

'एएनआय'शी बोलताना पूर्व रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी कौशिक मित्रा म्‍हणाले की, अपघातातील मृतांची संख्या आठ झाली आहे. बहुतांश प्रवासी मालदा आणि बोलपूरचे आहेत. बहुतांश प्रवासी सुरक्षित आहेत,"

या अपघाताबाबत पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्‍या X पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसीदेवा भागात, आत्ताच, एका दुःखद रेल्वे अपघाताविषयी जाणून मला धक्का बसला. तपशीलांची कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने धडक दिली,"

जिल्‍हाधिकारी, पोलीस अधीक्षक, डॉक्‍टर आणि आपत्ती टीम अपघात स्‍थळी रवाना झाल्‍या आहेत. मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्‍याचेही त्‍यांनी म्‍हटलं आहे. दरम्‍यान, जखमी प्रवाशांना बाहेर काढले जात आहे. अपघातानंतर रेल्वेचे कामकाज ठप्प झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news