Gold smuggling : चेन्नई विमानतळावर साडेसात कोटींचे सोने जप्त

सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांकडून रॅकेटचा पर्दाफाश
Gold smuggling
चेन्नई विमानतळावर साडेसात कोटींचे सोने जप्त केले.Pudhari File Photo

चेन्नई : येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दुबई आणि अबुधाबीहून आलेल्या तीन विविध फ्लाईटस्मधून सुमारे 11 प्रवशांकडून 7.58 कोटी रुपये किमतीचे 12.1 किलोग्रॅम सोन जप्त केले.

Gold smuggling
जम्मू-काश्मीरमधील उरी भागात लष्कराची मोठी कारवाई

सीमा शुल्क विभागाच्या राजस्व गुप्तचर निर्देशालयाने (डीआरआय) या मोहिमेची माहिती दिली आहे. सर्व दहा प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. काही प्रवाशांकडे पायमोजे आणि अंतर्वस्त्रात 2.9 कोटी रुपये किमतीचे 4.65 किलोग्रॅमच्या 10 सोनसाखळ्या सापडल्या. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी 20 ते 40 वयोगटातील असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. यातील एकाने जीन्स पँट विशेष पद्धतीने डिझाईन केली होती, तिच्या बेल्टच्या आता सोने लपवले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news