जम्मू-काश्मीरमधील उरी भागात लष्कराची मोठी कारवाई

२ दशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश
Army's major operation in Uri area 2  terrorist killed
जम्मू-काश्मीरमधील उरी भागात लष्कराची मोठी कारवाईFile Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क: उरी सेक्टरमध्ये (जम्मू-काश्मीर) सुरू असलेल्या घुसखोरीविरोधी कारवाईत भारतीय लष्कराला यश मिळाले आहे. लष्कराने आजच्या (दि.२३ जून) कारवाईत आणखी एका दशतवादाचा खात्मा (J&K Encounter) केला. दहशतवादविरोधी कारवाई सुरूच असल्याचेही भारतीय लष्कराने म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडला

विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे, जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला येथील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) शनिवारी (२२ जून) सुरू असलेल्या घुसखोरीविरोधी मोहिमेत किमान दोन दहशतवादी ठार झाले. चकमकीच्या ठिकाणी एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडला आहे.

Army's major operation in Uri area 2  terrorist killed
भारतीय लष्कर अत्याधुनिक अन् सतर्क : लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे

भारतीय लष्कर आणि संयुक्त सुरक्षा दलाची कारवाई

उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील गोहल्लान भागात भारतीय लष्कर आणि संयुक्त सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला (J&K Encounter) असल्याचेही वृत्तात म्हटले आहे.

१९ जून राजी बारामुल्लाच्या वाटरगाम भागात चकमक

यापूर्वी, १९ जून रोजी बारामुल्लाच्या वाटरगाम भागात बुधवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते आणि दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते. अधिका-यांनी सांगितले की, बारामुल्लाच्या वॉटरगाम भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीवरून सैन्याने घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू (J&K Encounter) केली.

Army's major operation in Uri area 2  terrorist killed
भारतीय लष्कराची कमाल : पाकिस्तानी ड्रोनवर लक्ष ठेवण्यासाठी घारींना प्रशिक्षण

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news