

Gold Rate Today :
आज सोमवारी (दि २९) सोन्या चांदीच्या दरात अल्पशी घसरण झाल्याचं दिसून आलं. २४ कॅरेट सोन्याच्या प्रती तोळा दरात १० रूपयांची तर चांदीच्या प्रतिकिलो दरात १०० रूपयांची घसरण झाली आहे. गोल्ड रिटर्न्स वेबसाईटच्या आकडेवारीनुसार २४ कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर आत १ लाख १५ हजार ४७० रूपये इतका होता. तर चांदीचा एका किलोचा दर हा १ लाख ४८ हजार ९०० रूपये इतका होता. दुसरीकडं २२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील १० रूपयांची घट झालेली दिसली. २२ कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर हा १ लाख ५ हजार ८४० रूपये इतका होता.
मुंबईत १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर हा १ लाख १५ हजार ४७० रूपये इतका आहे तर कोलकातामध्ये हाच दर १ लाख १६ हजार ०७० रूपये इतका राहिला. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची एका तोळ्याती किंमत १ लाख १५ हजार ६२० रूपये इतकी होती.
२२ कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचं झालं तर मुंबईत याचा प्रती तोळा दर हा १ लाख ०५ हजार ८४० रूपये इतका आहे. तर कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईत हाच दर १ लाख ०६ हजार ३९० इतका होता. दिल्लीत १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर हा १ लाख ०५ हजार ९९० इतका होता.
काय आहेत चांदीचे दर
दिल्लीत एक किलो चांदीचा आजचा दर हा १ लाख ४८ हजार ९०० रूपये इतका होता. हाच दर कोलकाता आणि मुंबईतही सारखाच आहे. तर चेन्नईत मात्र एक किलो चांदीचा आजचा दर हा १ लाख ५८ हजार ९०० रूपये इतका होता.
सोमवारी युएस गोल्ड प्राईस ही वाढली होती. ती जवळपास ऑल टाईम हाईटपर्यंत पोहचली होती. कमकवूत झालेला डॉलर आणि फेडरल रिजर्वचे या वर्षी व्याजदर स्थीर राहण्याची शक्यता यामुळं युएस गोल्ड प्राईस वाढलेली दिसली. स्पॉट गोल्डचा दर हा ०.५ टक्क्यांनी वाढून प्रती औन्स ३ हजार ७७६.७३ डॉलर इतका पोहचला होता. गेल्या आठवड्यात हाच दर रेकॉर्ड ब्रेक ३ हजार ७९०.८२ डॉलर इतका पोहचला होता. याचबरोबर युएस स्पॉट चांदीचे दर ०.६ टक्क्यांनी वाढले आहेत. तर प्लॅटिनमचा दर देखील २.२ टक्क्यांनी वाढला आहे.