Gold price Today | सोने दरात बदल, आजचा प्रति तोळ्याचा दर काय?

सोने महागण्याची 'ही' आहेत कारणे
Gold Rate Today, Gold Price Today
सोने पुन्हा एका ७२ हजार पार झाले आहे.file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

सोने (Gold price Today) पुन्हा एका ७२ हजार पार झाले आहे. आज बुधवारी (दि. ११ सप्टेंबर) शुद्ध सोन्याचा म्हणजेच २४ कॅरेटचा दर ४३२ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ७२,०२२ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर प्रति किलो ८२,९५४ रुपयांवर खुला झाला आहे. यावर्षी सोन्याने मे महिन्यात प्रति १० ग्रॅम ७४,२२२ रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. तर चांदी मे महिन्यात प्रति किलो ९४,२८० रुपयांवर पोहोचली होती. त्या तुलनेत सध्याचा चांदीचा दर कमी आहे.

ठळक मुद्दे

  • शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७२,०२२ रुपयांवर.

  • चांदीचा दर प्रति किलो ८२,९५४ रुपयांवर खुला.

  • २२ कॅरेटचा दर ६५,९७२ रुपयांवर पोहोचला.

  • मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात वाढ

Gold Rates Today : आजचे दर काय आहेत?

इंडिया बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज ९९९ शुद्ध (२४ कॅरेट) सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७२,०२२ रुपये, ९९५ शुद्ध सोन्याचा दर ७१,७३४ रुपये, ९१६ (२२ कॅरेट) दर ६५,९७२ रुपये, ७५० शुद्ध (१८ कॅरेट) सोन्याचा दर ५४,०१७ रुपये आणि ५८५ शुद्धतेच्या (१४ कॅरेट) सोन्याचा दर ४२,१३३ रुपयांवर खुला झाला आहे.

सोने महागण्याची 'ही' आहेत कारणे

जगातील ६ प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकेचा डॉलर निर्देशांक कमकुवत झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत डॉलरमध्ये मोजली जाते. पण डॉलरच्या कमकुवतपणामुळे तो इतर चलनांच्या तुलनेत स्वस्त होऊन त्याची मागणी वाढते. व्याजदर कपात, भू-राजकीय तणाव आणि अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणूक हे प्रमुख ट्रिगर्स असून हे घटक सोन्याच्या किमतीवर परिणाम करु शकतात. तसेच डॉलरची कामगिरी आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात नेमकी किती कपात होणार? या अंदाजामुळे सध्या सोन्याच्या दरात अस्थिरता दिसून येत असल्याचे सराफा बाजारातील विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Gold Rate Today, Gold Price Today
निवृत्तीनंतरच्या चांगल्या आयुष्यासाठी कसे करावे आर्थिक नियोजन?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news