

जम्मू-काश्मीर : PahalgamTerroristAttack | कर्नाटकातील शिवमोगा येथील मंजुनाथ हे आपल्या पत्नी पल्लवी आणि लहान मुलासोबत सुट्टीसाठी पहलगाममध्ये आले होते. हल्ल्याच्या वेळी मंजुनाथ यांना गोळी लागून जागीच मृत्यू झाला. पत्नी पल्लवी यांनी सांगितले की, माझ्या डोळ्यांसमोर माझ्या पतीला मारण्यात आलं. एक दहशतवादी म्हणाला,'जाओ मोदी को बता दाे'. पल्लवी यांनी त्यांच्या पतीचा मृतदेह तातडीने हवाई मार्गाने घरी पोहोचवण्याची मागणी केली आहे.
पल्लवी यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी नाव विचारल्यानंतर हिंदू आहोत असं सांगितल्यावर त्यांनी गोळी मारली. हल्ल्याच्या वेळी आमच्यासोबत आमचा मुलगाही होता. हल्ल्यावेळी काही स्थानिक नागरिकांनी धाव घेत पल्लवी यांची मदत केली. त्यांनी माझ्या पतीला ठार मारलं, मलाही मारा, असेही मी दहशतवाद्यांना म्हटले असता ते म्हणाले,'जाओ मोदी को बता दाे'. मोदींना हे सांगण्यासाठी तुला जिवंत ठेवले आहे, असेही एका दहशतवादी म्हणाला.
पहलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात एका महिलेच्या पतीला गोळी मारण्यात आली. घटनेनंतरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. दाम्पत्य शांततेने भेलपुरी खात असताना अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात महिलेच्या पतीचा मृत्यू झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अधिक तपास सुरू असून सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत.