3400 Lipstick Kisses On Car: गाडीवर उमटलं गर्लफ्रेंडचं '३४०० चुंबनांचे प्रेम... पोलिसांनी बॉयफ्रेंडला नियम दाखवताच गाडी चकाचक

3400 Lipstick Kisses On Car
3400 Lipstick Kisses On Carpudhari
Published on
Updated on

Car Covered In 3400 Lipstick Kisses: गर्लफ्रेंडने एका गाडीवर ३४०० लिपस्टिक किस दिल्याने मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ग्वाल्हेरचे कार मालक आदित्य सिकरवार यांच्या गर्लफ्रेंडने हा अनोखा उपक्रम राबवला आहे. तिने परदेशी ट्रेंडपासून प्रेरणा घेत चार तासात आपल्या बॉयफ्रेंडची गाडी लिपस्टिक किसने सजवून टाकली आहे. या बाबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यावर ट्रॅफिक पोलीसांनी कारवाईचा बडगा उचलला. ही गाडी थाटीपूरमधून पकडून त्यावर ५ हजार ५०० रूपयांचा दंड ठोठवला.

3400 Lipstick Kisses On Car
Viral Tech News : दोघांमध्‍ये AI 'तिसरा', तिने थेट बॉयफ्रेंडशी नाते तोडले! व्‍हायरल पोस्‍ट चर्चेत; नेमकं काय घडलं?

ग्वाल्हेरच्या त्या गाडीची चर्चा

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील एक गाडी चर्चेत आली होती. ही गाडी कोणत्या मॉडेलची किंवा सुपर कार नाहीये. एक सर्वसाधारण गाडी असूनही तिचा अजब लूकच चर्चेचा विषय बनला आहे. ही गाडी ज्यावेळी रस्त्यावरून जाते त्यावेळी लोकं त्याकडे टकामका पाहत असतात.

या गाडीच्या संपूर्ण बॉडीवर ठिक ठिकाणी लिपस्टिक किसच्या खुणा होत्या. दावा केला जात होता की या गाडीवर अशा लिपस्टिक किसच्या तब्बल ३४०० खुणा होत्या. सोशल मीडियावर ही गाडी तुफान व्हायरल झाली. त्यानंतर ही व्हिडिओ ट्रॅफिक पोलिसांकडे पोहचला अन् त्यांनी थेट नियमभंगाची कारवाईत केली.

3400 Lipstick Kisses On Car
Viral News: 'पैसे पाठवते, अंत्यसंस्कार तुम्हीच करा'; वृद्धाश्रमात वडिलांचा मृत्यू, लेकींनी व्हिडिओ कॉलवरच घेतले अंतिम दर्शन

सजवायला लागले तब्बल ४ तास

ही गाडी थाटीपूरच्या आदित्य सिकरवार यांची असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या गर्लफ्रेंडने परदेशी ट्रेंड पाहून आदित्य यांच्या गाडीवर हे एवढे भरमसाठी प्रेमळ किस दिले आहे. हे दिव्य काम करण्यासाठी आदित्य यांच्या गर्लफ्रेंडला तब्बल ४ तास लागले होते असं सांगण्यात येत आहे. यामागे हा क्षण यादगार करण्याचा उद्येश होता.

मात्र ही गाडी त्यावेळी रस्त्यावरून जात होती त्यावेळी लोकं त्याकडे आश्चर्याने पाहत होती. गाडीवर आदित्य यांच्या गर्लफ्रेंडने बरसवलेलं प्रेम हे लांबूनच दिसून येत होतं. लोकं वेगवेगळ्या पद्धतीनं याची चर्चा करत होते. विशेष म्हणजे ट्रॅफिक पोलिसांनी देखील या गाडीत विशेष रस दाखवत त्याची माहिती गोळा करायला सुरूवात केली.

3400 Lipstick Kisses On Car
Gorilla Viral News | बायकोशी भांडण झाल्यानंतर गोरिला ‘असा’ विचारात पडला!

पोलिसांची नजर पडली अन्

गाडीच्या नंबरवरून पोलिसांनी वाहन धारकाची माहिती आणि मालकाचा पत्ता शोधून काढला. त्यानंतर ही कार थाटीपूर भागातून ताब्यात घेण्यात आली अन् गाडी मालकांना बोलवून चौकशी करण्यात आली, पोलिसांची एन्ट्री होताच या प्रकरणातील थ्रिल संपलं अन् कायद्याची भाषा सुरू झाली.

पोलिसांनी या गाडीवर नियम मोडल्याची कारवाई केली. गाडीवर वेगवेगळे निशान करून ती चालवणे नियमबाह्य असल्याचं सांगत तब्बल ५५०० रूपयाचे चलान फाडले.

3400 Lipstick Kisses On Car
Viral News: "कपडे फाडेन अन् पोलिसात अडकवेन..." चोरी करताना रंगेहात पकडल्यानंतर महिलेची घरमालकालाच धमकी, व्हिडिओ व्हायरल

३४०० चुंबन पडले ५५०० रूपयांना

पोलिसांच्या या कारवाईमुळं गर्लफ्रेंडने गाडीवर दिलेले ३४०० किस हे गाडी मालकाला ५५०० रूपयांना पडले. पोलिसांनी सांगितलं की गाडी मालकांनी आपली चूक कबूल केली आहे. त्यानंतर गाडी मालकाने हे लिपस्टिकवाले किस गाडीवरून हटवण्यास सुरूवात केली. ट्रॅफिक पोलिसांनी सांगितलं की गाडी मालकाने स्वतःने गाडीवरील निशाण हटवले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news