.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
गाझियाबाद : गाझियाबादमध्ये एका 14 वर्षांच्या मुलीवर बलात्काराची घटना उघडकीला आल्यानंतर शुक्रवारी शहरात हिंसाचार उसळला. निदर्शकांनी जाळपोळ केली. पोलिसांनी ठिकठिकाणी निदर्शकांवर लाठीमार केला. आरोपी व पीडित वेगवेगळ्या समुदायातील आहेत. बलात्कार प्रकरणातील आरोपी भंगार विक्रेता फैजान याला अटक करण्यात आली आहे. पीडितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची अफवा पसरविण्यात आल्याने हिंसाचार झाला, असा दावा पोलिस उपायुक्त निमिष पाटील यांनी केला.
शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी हे प्रकरण उचलून धरले. जमावाने आरोपी फैजान याच्या दुकानाची तोडफोड करून आग लावली. लगतच्या परिसरातही जे दिसेल ते जाळायला सुरुवात केली. पोलिसांनी लाठीमार केल्याने जमाव पांगला.फैजान घरात बलात्कार करत असताना त्याचे काही मित्र घराबाहेर पहारा देत उभे होते, अशी नवी माहिती या प्रकरणात प्राप्त झाली आहे. पोलिस या पहारेकरी मित्रांचाही शोध घेत आहेत. शहरात पोलिस बंदोबस्त वाढवलेला आहे. आरोपीच्या घरालगत 5 पोलिस ठाण्यांचा फौजफाटा तैनात आहे.