Prithviraj Chavan | शिक्षणमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना ‘जेन झी’ आणि काँग्रेस स्वीकारणार नाही : पृथ्वीराज चव्हाण 

शिक्षणमंत्रीपदासंदर्भात केंद्रातील सर्व मंत्र्यांच्या क्षमतेवरही उपस्थित केला प्रश्न
Prithviraj Chavan on Devendra Fadnavis
Prithviraj Chavan on Devendra FadnavisPudhari
Published on
Updated on

Prithviraj Chavan on Devendra Fadnavis

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी हा ‘सीजेपी’ आणि ‘जेन झी’च्या ऐतिहासिक आंदोलनाचे पहिले यश आहे. पुढे शिक्षणमंत्रिपदासाठी सक्षम राष्ट्रीय चेहरा आवश्यक आहे. मात्र, तसा कोणताही चेहरा केंद्राच्या मंत्रिमंडळात नाही. देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत आणण्याच्या चर्चा होत्या मात्र, त्यांनाही ‘जेन झी’ आणि काँग्रेस स्वीकारणार नाही, अशा आशयाचे ट्विट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. यावेळी त्यांनी एकप्रकारे केंद्रातील सर्व मंत्र्यांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, शिक्षणमंत्रिपदासाठी कॉर्पोरेट क्षेत्रातील नंदन नीलेकणी यांच्या नावाचीही त्यांनी चर्चा केली.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, पंतप्रधानांनी शिक्षण मंत्रालयाचा तात्पुरता कार्यभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपविला आहे. जोशी यांच्याकडे आधीच तीन मंत्रालयांची जबाबदारी असून, आता चौथ्या मंत्रालयाचीही जबाबदारी आली आहे. ही पावसाळी अधिवेशनापर्यंतची तात्पुरती व्यवस्था आहे.

Prithviraj Chavan on Devendra Fadnavis
Prithviraj Chavan: 'मोदी सरकारचा शेवट जवळ आला'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

नवे शिक्षणमंत्री राष्ट्रीय स्तरावरील व्यक्तिमत्त्व असावे, त्यांना ‘जेन झी’शी संवाद साधता यावा, ढासळलेली शिक्षणव्यवस्था सुधारता यावी आणि शिक्षणासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली. मात्र, सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात अशी व्यक्ती दिसत नसल्याचेही त्यांनी म्हटले.

चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांना दिल्लीला आणून शिक्षणमंत्रिपद देण्याची चर्चा आहे. मात्र, २०२६च्या नीट पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रातील काही कोचिंग संस्था आणि पेपर तयार करणाऱ्यांवर आरोप झाले असून, फडणवीस हे राज्याचे गृहमंत्रीही आहेत. त्यामुळे ‘जेन झी’ आणि काँग्रेस त्यांना स्वीकारणार नाही.

Prithviraj Chavan on Devendra Fadnavis
Prithviraj Chavan : मिसिंग लिंक प्रकल्पाला विरोध कधीच नव्हता, सुरक्षा महत्वाची : पृथ्वीराज चव्हाण

शिक्षणतज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी किंवा माजी कुलगुरूचा शिक्षणमंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो. मात्र, उच्च शिक्षण व्यवस्थेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निष्ठावान व्यक्तींच्या नियुक्त्या झाल्या असून त्यातील बहुतांश जण प्रभावी नसल्याची टीकाही त्यांनी केली. त्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्तीचा विचार करता येईल, असे सांगत त्यांनी ‘नंदन नीलेकणी?’ असा सवाल उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news