Gas : घरगुती गॅस सिलेंडर दरात २५ रुपयांची वाढ

Gas : घरगुती गॅस सिलेंडर दरात २५ रुपयांची वाढ
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी महिन्याच्या सुरुवातीलाच विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ केली आहे. ताज्या दरवाढीनंतर दिल्ली तसेच मुंबईमध्ये १४.२ किलो वजनाच्या गॅस (Gas) सिलेंडरचे दर ८८४.५० रुपयांवर गेले आहेत.

दुसरीकडे चेन्नई, कोलकाता आदी शहरांमध्ये सिलेंडर दराने ९०० रुपयांचा आकडा ओलांडला आहे. १ जानेवारीपासून गॅस (Gas) सिलेंडर दरात आतापर्यंत १९० रुपयांची वाढ झाली आहे.

तेल कंपन्यांकडून १ जुलैपासून सिलेंडर दरात ७५.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. जुलैमध्ये ही वाढ २५.५० रुपयांची तर ऑगस्टमध्ये २५ रुपयांची होती. आता १ सप्टेंबर रोजी पुन्हा २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

कोलकाता येथे सिलेंडरचे दर ९११ रुपयांवर तर तामिळनाडूतील चेन्नईमध्ये हेच दर ९००.५० रुपयांवर पोहोचले आहेत. प्रत्येक महिन्यात दरवाढ करून गॅस सिलेंडरवरील सबसिडी समाप्त करण्याचा प्रयत्न असल्याचे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती गेल्या सात वर्षात दुपटीने वाढल्या आहेत. १ मार्च २०१४ रोजी गॅस सिलेंडरची किंमत ४१०.५ रुपये इतकी होती.

दरम्यान तेल कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ७५ रुपयांची वाढ केली आहे. दर महिन्याच्या १ आणि १५ तारखेला जागतिक बाजारपेठेतील दरांचा आढावा घेऊन गॅस सिलेंडर दरात वाढ किंवा घट केली जाते.

एका मिसकॉलद्वारे मिळणार एलपीजी कनेक्शन

नागरिकांना एलपीजी कनेक्शन घेण्यासाठी गॅस वितरकांकडे जावे लागते. पण यापुढे कनेक्शन घेण्यासाठी एक मिसकॉल पुरेसा असल्याचे इंडियन ऑईलकडून सांगण्यात आले आहे. फक्त इंडियन ऑईलमध्येच ही सुविधा मिळणार आहे.

पहा व्हिडीओ : कवयित्री बनलेल्या प्राजक्ता माळीशी दिलखुलास संवाद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news