FSSAI Ban Rum Whisky Brand: भारतातील Old Monk अन् इतर रम अन् व्हिस्की ब्रँड्सला FSSAI चा दणका... कमी गुणवत्ता, विक्रीवर बंदी

FSSAI Ban Rum Whisky Brand
FSSAI Ban Rum Whisky Brandpudhari
Published on
Updated on

FSSAI Ban Rum Whisky Brand: भारताच्या FSSAI ने भारतातील अनेक व्हिस्की आणि रमच्या ब्रँड्सची तपासणी केली. त्यांच्या या तपासणीत अनेक ब्रँड्स हे फ्लेवरिंग प्रॅक्टिस करत आहेत. ही प्रॅक्टिस ठरवलेल्या निकषानुसार नाहीये. त्यामुळं द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथोरिटी ऑफ इंडियाने सांगितलं की हे कमी गुणवत्तची व्हिस्की अन् रम ही डिएगो इंडिया युनायटेड स्पिरीट, इनब्रिव्ह ब्रिव्हरेज आणि मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर या ब्रँड्सवर याचा परिणा झाला आहे. त्यांनी चव आणि अरोमा निर्माण करण्यासाठी आर्टिफिशअल फ्लेवरचा वापर केला आहे. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

या निर्णयामुळं भारताच्या लिकर मार्केटवर मोठा परिणाम झाला असून भारतातील मद्यपी हे देशांतर्गत निर्माण झालेल्या मद्याचे मोठ्या प्रमाणावर सेवन करतात. याची किंमत इम्पॉर्टेट व्हिस्की, रम आणि स्कॉच यापेक्षा कमी असते.

भारत हा जगातील सर्वात मोठे अल्कोहोल मार्केटपैकी एक आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न हे जवळपास ३.८ लाख कोटी रूपये इतके आहे. डिओगोचा भारतातील मार्केट शेअर सर्वाधिक आहे.

FSSAI ने दिलेल्या माहितीनुसार नियमानुसार अल्कोहोल ब्रिव्हरेजमध्ये नैसर्गिक फ्लेवरिंग सबस्टन्स असावा. मात्र चाचणीत डिएगो आणि एनब्रिव्ह फॅक्टरीमध्ये फ्लेवरिंग बाबदचे तपशील मिळाले आहेत. FSSAI ने सांगितलं की, 'आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानांकित मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रियेत रम आणि व्हिस्की फ्लेवर घालण्याची कोणतीही प्रॅक्टिस नाही.'

या पद्धतीमुळं योग्य प्रकारे मद्यनिर्मिती करण्याची गरजच उरत नाही. तसेच पारंपरिकरित्या ज्या पदार्थांवर ही प्रक्रिया अवलंबून होती त्यावरचे अवलंबत्व कमी होते. यात मोलॅसिस, मॉल्ट आणि द्राक्षांचा समावेश आहे.

FSSAI च्या कारवाईच्या कचाट्यात युनायटेड स्पीरटच्या अँटीक्वी ब्लू व्हिस्की आणि रॉयल चॅलेंजर व्हिस्की यांच्या मध्य प्रदेशातील प्लांटमधील उत्पादन प्रभावित झाले आहे. तसेच इनब्रिव्ह बिव्हरेजेस ज्यात बॅकपायपर डिलक्स व्हिस्की आणि ओल्ड कास्क डिलक्स ट्रपल एक्स रम यांचा देखील समावेश आहे. यांचे मध्य प्रदेशातील प्लांटमधील उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे.

तसेच प्रसिद्ध मोहन रॉकी प्रिंगवाटरच्या ओल्ड माँकचे तीन व्हिरिएन्ट जे महाराष्ट्रातील फॅक्टरीमध्ये तयार होतात त्यांचा देखील या कारवाईत समावेश आहे. ऑल्ड माँक ही भारतातील सर्वात जुना आणि सर्वमान्य रम ब्रँड आहे. FSSAI ने सांगितलं की प्रयोगशाळेतील तपासणीत या मद्याची गुणवत्ता कमी आढळू आली. यात आर्टिफिशल फ्लेवर आढळून आला आहे.

दरम्यान, मद्य उद्योगातील दोन वरिष्ठ एक्झिक्युटिव्हने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं की आम्हाला प्रशासनाच्या निर्यामुळं काळजी वाटत आहे. फ्लेवरचा वापर करणं हे भारताच्या नियमानुसारच आहे. आता ही बंधने फक्त ठराविक प्लांटबात आहेत की याची व्याप्ती वाढणार आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. आम्ही ज्या शंका आणि स्पष्टीकरण मागितलं आहे त्यावर अजून FSSAI ने प्रतिक्रिया दिलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news