.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांचे चेन्नई येथे आज (दि. १९) निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. ४३ वर्षांहून अधिक लष्करी सेवा पूर्ण करून ३१ डिसेंबर २००२ रोजी ते निवृत्त झाले होते.
जनरल सुंदरराजन पद्मनाभन हे भारताचे २० वे लष्करप्रमुख होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिरेक्यांवर मोठा विजय मिळवला होता. लष्करप्रमुखपदी नियुक्तीपूर्वी ते नॉर्दन कमांड आणि सदर्न कमांडचे जीओसी होते. जनरल पद्मनाभन सप्टेंबर २००० ते डिसेंबर २००२ पर्यंत लष्करप्रमुख होते. त्यांचा जन्म केरळमधील तिरुवनंतपुरम येथे झाला होता. राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय (RIMC), डेहराडून आणि राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणेचे ते माजी विद्यार्थी होते. १९९३ ते ९५ या काळात काश्मीर खोऱ्यातील १५ कॉर्प्सचे कमांडर म्हणून जनरल पद्मनाभन यांनी लष्कराला काश्मीरमधील दहशतवाद्यांवर मोठा विजय मिळवून देण्यात आणि त्यांच्या कारवाया कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.