GN Saibaba passes away | दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक साईबाबा यांचे निधन

UAPA प्रकरणात १० वर्षे होते तुरुंगात
DU Former Professor GN Saibaba passes away
दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक साईबाबा यांचे निधनfile photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क | DU Former Professor GN Saibaba passes away : दिल्ली विद्यापीठाचे माजी प्रा. जीएन साईबाबा (वय ५७) यांचे हैदराबाद येथे निधन झाले. मुंबई उच्च न्यायालयाने ७ महिन्यांपूर्वी कथित माओवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यांच्यावर गेल्या २० दिवसांपासून हैदराबादच्या निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (NIMS) मध्ये उपचार सुरू होते. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी आहेत.

यावर्षी मार्चमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने माओवाद्यांशी संबंध असल्याच्या युएपीए (UAPA) प्रकरणात साईबाबा यांना दोषमुक्त केले होते. त्यांना १० वर्षे खटल्याचा सामना करावा लागला होता. दिल्ली विद्यापीठाच्या राम लाल आनंद महाविद्यालयात ते इंग्रजीचे प्राध्यापक होते. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांना कॉलेजने निलंबित केले होते.

जन्मठेपेची शिक्षा झाली रद्द

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मार्चमध्ये साईबाबा आणि अन्य पाच जणांना कथित माओवादी संबंधांच्या प्रकरणातून दोषमुक्त केले होते. त्यांच्याविरुद्ध खटला सिद्ध करण्यात फिर्यादी पक्ष अपयशी ठरला होता. न्यायालयाने त्यांची जन्मठेपेची शिक्षाही रद्द केली होती. बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याच्या (यूएपीए) तरतुदींखाली आरोपींवर आरोप ठेवण्यासाठी फिर्यादीने प्राप्त केलेली मंजुरी न्यायालयाने 'अवैध' असल्याचे म्हटले. निर्दोष सुटल्यानंतर साईबाबा १० वर्षांनी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आले. कारागृहात असताना अर्धांगवायू झाला, मात्र अधिकाऱ्यांनी नऊ महिने रुग्णालयात नेले नाही, फक्त वेदनाशामक औषधे देण्यात आली, असा आरोप साईबाबा यांनी ऑगस्टमध्ये केला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news