

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे माजी मंत्री आणि आपचे माजी नेते कैलाश गहलोत यांनी आज (दि.१८) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर आणि इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत होते. गेहलोत यांनी (दि.१७) रविवारीच मंत्री पदाचा राजीनामा दिला. त्याचबरोबर पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही सोडले होते.
आपचे ज्येष्ठ नेते कैलाश गेहलोत यांनी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना पत्राद्वारे राजीनामा देत असल्याची माहिती दिली होती. त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याकडे राजीनामा दिला. यानंतर आज त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत हाती कमळ घेतले आहे.
आम आदमी पक्षाने लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. तसेच आपचा केंद्र सरकारसोबत लढण्यामध्ये जास्त वेळ वाया जात असल्या कारणाने पक्षाचा राजीनामा देत असल्याचे गेहलोत यांनी म्हटले आहे. केजरीवाल सरकारच्या काळात यमुना नदी अधिक प्रदूषित झाली असल्याची टीका देखील कैलाश गेहलोत यांनी पक्षाला लिहलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.