UCO Bank Ex CMD arrest: यूको बँकेच्या माजी अध्यक्षाला अटक; 6210 कोटींचा घोटाळा; 'ईडी'ने जप्त केली 510 कोटींची मालमत्ता

UCO Bank Ex CMD arrest: गोयल यांच्या 'गैर' फायद्यांची यादी चक्रावणारी; शेल कंपन्यांत लपवला पैसा, कोलकाता कोर्टाने 21 मेपर्यंत ईडी कोठडी मंजूर
UCO Bank Ex CMD Subodh Kumar Goel
UCO Bank Ex CMD Subodh Kumar Goelpudhari
Published on
Updated on

ED arrested UCO Bank Ex CMD Subodh Kumar Goel

नवी दिल्ली : सक्तवसुली संचलनालयाने (ED) ने युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुबोध कुमार गोयल यांना 6210.72 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणी अटक केली आहे.

ही फसवणूक कन्कास्ट स्टील अँड पॉवर लिमिटेड (CSPL) या कंपनीशी संबंधित आहे. गोयल यांना 16 मे रोजी त्यांच्या दिल्लीतील राहत्या घरातून अटक करण्यात आली.

हा तपास मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत सुरू असून त्यात CSPL आणि इतरांची चौकशी केली जात आहे. 17 मे रोजी गोयल यांना कोलकाता येथील विशेष न्यायालयात (PMLA) हजर करण्यात आले आणि न्यायालयाने त्यांना 21 मेपर्यंत ED च्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

UCO Bank Ex CMD Subodh Kumar Goel
Jyoti Malhotra Case: ज्योतीमुळे अडचणीत सापडलेली ओडिशातील युट्यूबर कोण?

कोलकातामध्ये CBI ने दाखल केली होती FIR

ED ने हा तपास कोलकाता CBI ने दाखल केलेल्या FIR वर आधारित करून सुरू केला. या प्रकरणात CSPL ला मंजूर करण्यात आलेल्या क्रेडिट सुविधांचा गैरवापर होऊन सुमारे 6210.72 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे आढळले आहे. ही रक्कम केवळ मूळ रक्कम असून त्यात व्याजाचा समावेश नाही.

ED नुसार, गोयल यांच्या कार्यकाळात CSPL ला मोठ्या प्रमाणात कर्ज सुविधा मंजूर करण्यात आल्या होत्या आणि नंतर संबंधित गटाने त्या रकमा वळवून गैरवापर केला. याच्या मोबदल्यात, गोयल यांनी CSPL कडून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर फायदे मिळवले, असे उघड झाले आहे.

UCO Bank Ex CMD Subodh Kumar Goel
Javed Akhtar on Pakistan: नरक आणि पाकिस्तान असे दोनच पर्याय असतील तर मी नरकात जाईन; जावेद अख्तर यांचा घणाघात

शेल कंपन्यांमध्ये लपवले पैसे

या बेकायदेशीर फायद्यांचे स्वरूप रोख रक्कम, मालमत्ता, महागड्या वस्तू, हॉटेल बुकिंग्स अशा विविध प्रकारात होते. हे फायदे शेल कंपन्या, बनावट व्यक्ती आणि कुटुंबीयांच्या नावावरून दिले गेले होते जेणेकरून पैशाचा मूळ स्रोत लपवता येईल.

"अनेक मालमत्ता शेल कंपन्यांद्वारे खरेदी केल्याचे उघड झाले आहे," असे ED ने सांगितले.

या कंपन्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सुबोध गोयल आणि त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात होत्या. या शेल कंपन्यांना मिळालेले निधी हे थेट CSPL कडून आले असल्याचे समोर आले आहे. बनावट व्यवहार आणि फ्रंट कंपन्यांमार्फत पैसे लपवण्याची क्लिष्ट रचना ED ने उघड केली आहे.

UCO Bank Ex CMD Subodh Kumar Goel
China speed up Dam in Pakistan: पाकिस्तानातील मोहमंद धरणाच्या बांधकामाला चीनने दिली गती, 700 फूट उंचीचे जगातील पाचव्या क्रमांकाचे धरण

510 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच

22 एप्रिल रोजी ED ने गोयल यांच्या निवासस्थानी आणि इतर ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांमध्ये ED ला बेकायदेशीर फायदे मिळाल्याचे स्पष्ट करणारे महत्त्वाचे पुरावे सापडले.

या प्रकरणात याआधी, ED ने सुमारे 510 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेवर (CSPL आणि त्याचे मुख्य प्रवर्तक संजय सुरेका यांच्याशी संबंधित) तात्पुरती जप्ती केली होती. ED ने देशभरातील अनेक ठिकाणी छापे टाकून महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले होते.

CSPL चा मुख्य प्रवर्तक संजय सुरेका यालाही अटक

CSPL चा मुख्य प्रवर्तक संजय सुरेका याला 18 डिसेंबर 2024 रोजी अटक करण्यात आली होती आणि तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणी 15 फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील सिटी सेशन्स कोर्टात (मुख्य न्यायाधीशांकडे) आरोपपत्र दाखल करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news