Foreign Assets Disclosure | परदेशी लपवलेली संपत्ती आता करा कायदेशीर; केंद्र सरकारची 'FAST-DS' योजना जाहीर!

Foreign Assets Disclosure | परदेशात अघोषित ठेवलेली मालमत्ता, बँक खाती, रोख रक्कम, स्थावर मालमत्ता, दागिने, कलाकृती, शेअर्स, सिक्युरिटीज किंवा अन्य उत्पन्न स्वेच्छेने जाहीर करण्याची एकदाच संधी केंद्र सरकारने दिली आहे.
Foreign Assets Disclosure
Foreign Assets Disclosure
Published on
Updated on

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
परदेशात अघोषित ठेवलेली मालमत्ता, बँक खाती, रोख रक्कम, स्थावर मालमत्ता, दागिने, कलाकृती, शेअर्स, सिक्युरिटीज किंवा अन्य उत्पन्न स्वेच्छेने जाहीर करण्याची एकदाच संधी केंद्र सरकारने दिली आहे.

Foreign Assets Disclosure
Gadchiroli Ashram School | गडचिरोली सर्पदंश प्रकरण: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून मुख्य सचिवांना नोटीस

'फॉरेन ॲसेट्स ऑफ स्मॉल टॅक्सपेयर्स - डिस्क्लोजर स्कीम' ('एफएएसटी-डीएस' : FAST-DS) या योजनेची अंमलबजावणी १६ ऑगस्टपासून सुरू होणार असून, घोषणा करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२६ आहे.

योजनेत प्रामुख्याने दोन प्रकारच्या मालमत्ता किंवा उत्पन्नाचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या प्रकारात भारताबाहेरील १ कोटी रुपयांपर्यंतचे अघोषित परदेशी उत्पन्न किंवा मालमत्ता येते. दुसऱ्या प्रकारात ५ कोटी रुपयांपर्यंतच्या परदेशातील मालमत्तेचा समावेश आहे.

Foreign Assets Disclosure
Yeola Paithani postal stamp release | येवला पैठणीचा राष्ट्रीय सन्मान! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

भारतात रहिवासी होण्यापूर्वी अनिवासी असताना परदेशातील उत्पन्नातून ही मालमत्ता मिळवली असेल, मात्र भारतात रहिवासी झाल्यानंतरच्या प्राप्तिकर विवरणपत्रात माहिती दिली नसेल, तर ती या योजनेअंतर्गत जाहीर करता येईल. तसेच, ज्या मालमत्तेसाठी प्राप्तिकर भरला आहे; मात्र विवरणपत्रात नोंद करण्यात आलेली नाही, अशा मालमत्तेलाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

३१ डिसेंबरपर्यंत मुदत

योजनेची अंमलबजावणी १६ ऑगस्टपासून सुरू होणार असून, घोषणा करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२६ आहे. या योजनेमुळे करदात्यांना आपली अघोषित परदेशी मालमत्ता कायदेशीर करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news