अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोडांची दिल्लीवारी, केंद्रीय गृहमंत्र्यांची घेणार भेट

अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोडांची दिल्लीवारी, केंद्रीय गृहमंत्र्यांची घेणार भेट
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहत आहेत.मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याची सर्वत्र चर्चा सुरू असताना अन्न व औषधी प्रशासन मंत्री संजय राठोड मंगळवारी दिल्लीत दाखल झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे त्यांनी भेटीसाठी वेळ मागितली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, यासंदर्भात राठोड यांच्याशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही.बुधवारी राठोड दौऱ्यासंबंधी माहिती देतील,अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच शहा यांची भेट घेतली होती.या भेटीनंतर काही मंत्र्यांचे खाते काढून घेतली जाण्याची चर्चा रंगली आहे.गेल्या महिन्यात महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन ने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विभागात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती.या तक्रारीनंतर राठोड यांच्यावर शिंदेंची नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. याच अनुषंगाने राठोड यांचा दिल्ली दौरा असल्याची चर्चा रंगली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news