18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन उद्यापासून

नरेंद्र मोदींसह नवनिर्वाचित खासदार शपथ घेणार
First session of 18th Lok Sabha
18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन उद्यापासून File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क: 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवार (दि.२४ जून) पासून सुरू होणार आहे, (18th Lok Sabha Session) ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नवनिर्वाचित खासदार शपथ घेतील, त्यानंतर हंगामी अध्यक्षांची निवड होईल आणि दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अभिभाषण करतील, असे वृत्त ‘इंडिया टुडे‘ने दिले आहे.

राष्ट्रपती मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार

सोमवारी(दि.२४जून) सकाळी ११ वाजता पंतप्रधान मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळ शपथ घेणार आहेत. बुधवारी २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७ जून रोजी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार (18th Lok Sabha Session) आहेत, असेही वृत्तात म्हटले आहे.

नवनिर्वाचित 280 खासदार घेणार उद्या शपथ

सोमवारी (दि.२४ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळासह 280 नवनिर्वाचित खासदार शपथ घेतील. तर 264 नवनिर्वाचित खासदार दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.२५ जून) शपथ घेतील (18th Lok Sabha Session).

NDA कडे 293 जागांसह बहुमत

एप्रिल-जूनमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर हे पहिलेच लोकसभेचे अधिवेशन (18th Lok Sabha Session) असेल. 18 व्या लोकसभेत, NDA कडे 293 जागांसह बहुमत आहे, यामध्ये भाजपकडे 240 जागा आहेत, जे बहुमताच्या 272 पेक्षा कमी आहे. तर विरोधी गट असलेल्या इंडिया आघाडीकडे  234 जागा आहेत, ज्यात काँग्रेसचा वाटा 99 आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news