१८ व्‍या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून

१८ व्‍या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अठराव्‍या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून सुरु होणार आहे. तसेच राज्यसभेचे अधिवेशन २७ जूनपासून सुरू होणार आहे. २७ जून राेेजी राष्ट्रपती संयुक्त बैठकीला संबोधित करतील. अधिवेशन कालावधीत नूतन शपथविधी, लोकसभा अध्यक्षांची निवड, राष्ट्रपतींचे अभिभाषण आदींवर चर्चा होणार आहे. दोन्ही सभागृहांचे कामकाज ३ जुलैपर्यंत सुरु राहणार आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.

१८ व्‍या लोकसभेत सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे २९३ खासदार आहेत तर विरोधी पक्ष इंडिया आघाडीचे २४० खासदार आहेत. रिजिजू यांनी X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की,१८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून सुरू होईल, ज्यामध्ये नवनिर्वाचित सदस्य शपथ घेतील. अधिवेशनाच्या पहिल्या तीन दिवशी नवनिर्वाचित नेत्यांचा शपथविधी होणार आहे. यासोबतच सभागृह अध्यक्षांची निवडही होणार आहे. अधिवेशनाचा समारोप ३ जुलै रोजी होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news