ज्ञानेश्वर मुळे यांना पहिला चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा
Dnyaneshwar Mulay
ज्ञानेश्वर मुळे Pudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : पासपोर्ट मॅन अशी ओळख असलेले भारतीय परराष्ट्र सेवेतील निवृत्त वरिष्ठ अधिकारी, प्रसिद्ध लेखक, साहित्यिक ज्ञानेश्वर मुळे यांना जाहीर करण्यात आला आहे. बुधवारी (दि.१६ ) केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तर जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल एन. एन .व्होरा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Dnyaneshwar Mulay
सीएसआयआर सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर मुळे 

रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर, भारताचे माजी अर्थमंत्री, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या प्रयत्नांना विरोध म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा देणारे सी. डी. देशमुख यांना यथोचित आदरांजली देण्यासाठी दिल्लीत होणार्‍या ९८ व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सी. डी. देशमुख यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. सरहद संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेला हा पुरस्कार ज्ञानेश्वर मुळे यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती सरहद संस्थेचे विश्वस्त अनुज नहार व शैलेश वाडेकर यांनी दिली.

Dnyaneshwar Mulay
Narendra Modi | 'लखपती दिदी' मुळे महिलांचा सन्मान वाढून संपूर्ण परिवाराचा भाग्योदय

ज्ञानेश्वर मुळे यांनी भारतीय परराष्ट्र सेवेद्वारे जपान, रशिया, सिरिया, मालदीव, अमेरिका येथे राजदूत म्हणून सेवा बजावली आहे. जगभरातील राष्ट्र प्रमुखांशी व्यक्तिगत संपर्क आलेले मुळे यांनी मराठी तरूणांनी भारतीय प्रशासकीय सेवेते यावे, यासाठी 'पुढचे पाऊल' तसेच चांगूलपणाची चळवळ यासाठी समर्पित केला आहे. दिल्लीतील मराठी अस्मितेसाठी त्यांनी केलेल्या अनन्यसाधारण कामगिरीची गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मानचिन्ह, स्मृतीचिन्ह, गौरवपत्र व ५१ हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news