Female Biker Hit and Run : निर्लज्जपणाचा कळस! महिला बायकरला उडवणाऱ्या 'त्या' कारचालकाच्या समर्थनार्थ गाणी वाजवत रॅली

अपघात प्रकरणातील दोन्ही आरोपींची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी
Female Biker Hit and Run
Published on
Updated on

Female Biker Hit and Run : "गुर्जर कल्याण बैंसला यांना पूर्ण पाठिंबा. एकदा समोरासमोर येऊन त्यांना 'गुंड' म्हणून दाखवाच," अशा धमकीवजा घोषणा देत महिला बायकरला उडवणाऱ्या कारचालकाच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हरियाणामधील एका उड्डाणपुलावरून अनेक गाड्या एकत्र जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

काय घडलं होतं?

रविवार, १३ सप्टेंबर रोजी सकाळी महिला बायकर शिवानी चौहान (उर्फ सिया) आपल्या बायकर ग्रुपसोबत जात होती. आरोपी कल्याण बैंसलाच्या कारने तिचा पाठलाग सुरू केला. कारमधील व्यक्ती मद्यधुंद असल्याचे दिसून आल्याने सियाने त्यांना सुरक्षित अंतर ठेवण्यास सांगितले. मात्र, बेदरकार कारचालकाने थेट तिच्या बाईकला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत सिया रस्त्यावर फेकली गेली आणि कित्येक मीटर घासली गेली. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेचा थरार तिच्या हेल्मेट कॅमेऱ्यात आणि पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या बायकरच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काही तासांनी सियाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. अल्पवधीत तो प्रचंड व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेत बैंसला याला अटक केली होती.

Female Biker Hit and Run
Hit and Run case : बेदरकारपणाचा कळस! ७३ वर्षीय कार चालक सुसाट! बाईकला धडक देत अर्धा किलोमीटरपर्यंत नेले फरफटत!

कारचालकाच्या समर्थनार्थ गाणी वाजवत रॅली

"गुर्जर कल्याण बैंसला यांना पूर्ण पाठिंबा. एकदा समोरासमोर येऊन त्यांना 'गुंड' म्हणून दाखवाच," अशा धमकीवजा घोषणा देत महिला बायकरला उडवणाऱ्या कारचालकाच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली. याचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाला आहे. यावर संतप्‍त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Female Biker Hit and Run
Nithari Case Surinder Koli : देशाला हादरवून सोडणाऱ्या 'निठारी हत्याकांडा'तील सुरेंद्र कोळीने हरिद्वारमध्ये संपवले जीवन

आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

महिला बायकर शिवानी चौहान (उर्फ सिया)ला उडवल्याप्रकरणी कल्याण बैंसला आणि लवनीश या दोन आरोपींची शुक्रवारी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयाने पुढील सुनावणी १ ऑक्टोबर रोजी निश्चित केली आहे. शुक्रवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर बैंसला आणि त्याचा चुलत भाऊ लवनीश यांना दिवाणी न्यायाधीश निधी बेनीवाल यांच्यासमोर हजर करण्यात आले. यापूर्वी गुरुग्राम न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news