सुप्रीम कोर्टाच्या नावाने बनावट संकेतस्थळ

सुप्रीम कोर्टाच्या नावाने बनावट संकेतस्थळ
Published on
Updated on

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत संकेतस्थळाच्या नावाने नागरिकांना धोका देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समोर आले आहे. यासाठी कोर्टाने परिपत्रक शेअर केले असून, अधिकृत संकेतस्थळाशी मिळतेजुळते बनावट संकेतस्थळ तयार केले असल्याचे म्हटले आहे. या बनावट स्थळाच्या माध्यमातून हॅकर्स लोकांची खासगी आणि गोपनीय माहिती गोळा करत आहेत. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन कोर्टाने केले आहे. हे बनावट संकेतस्थळ एचटीटीपीः//सीबीआयएनस/एससीआयजीव्ही आणि एचटीटीपीः//सीबीआयएनस/एससीआयजीव्ही डॉट कॉम/ ऑफेन्स या यूआरएलवरून चालवले जात आहे.

यामध्ये दुसर्‍या यूआरएलवर क्लिक केल्यानंतर हे संकेतस्थळ उघडले जाते आणि ऑफेन्स ऑफ मनी लाँडरिंग असे शीर्षक लिहिले जाते. या बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांचे इंटरनेट बँकिंग, क्रेडिट आणि डेबिट कार्डशी संबंधित माहिती हॅकर्सकडून चोरली जात आहे. अधिकृत संकेतस्थळासारख्या दिसणार्‍या या साईटवर माहिती भरण्यासाठी अनेक बॉक्स आहेत. यामध्ये बँकेचे नाव, फोन नंबर, पॅन नंबर, ऑनलाईन बँकिंग यूजर आयडी, लॉगईन पासवर्ड आणि कार्डच्या पासवर्डचा समावेश असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारची खासगी आणि गोपनीय माहिती शेअर करू नये, अशी सक्त ताकीत कोर्टाने दिली आहे.

पासवर्ड बदलण्याचा सरन्यायाधीशांचा सल्ला

बनावट संकेतस्थळाची माहिती कायदा संचालनालय यंत्रणांना दिली असून, आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. कोणत्याही 'यूआरएल'वर क्लिक करण्यापूर्वी त्याची पूर्ण माहिती घ्यावी. यूजर्सची माहिती चोरली गेल्यास तत्काळ सर्व ऑनलाईन अकाऊंटस्चा पासवर्ड बदलावा आणि याबाबतची माहिती तत्काळ आपल्या बँकेला आणि क्रेडिट कार्ड कंपनीला द्यावी, असा सावधानतेचा इशारा सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी कोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news