Central Armed Police Force|केंद्रीय सशस्त्र पोलिस दलासाठी ४ ऑगस्टला परीक्षा

केंद्रीय सशस्त्र पोलिस दल भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी.
Central Armed Police Force
केंद्रीय सशस्त्र पोलिस दलासाठी ४ ऑगस्टला परीक्षाFile Photo
Published on
Updated on

केंद्रीय सशस्त्र पोलिस दल भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने या भरतीसाठी परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. यूपीएससीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार ४ ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.

Central Armed Police Force
Maharashtra Farmer| शेतकरी कर्जमाफीची शक्यता फेटाळली

परीक्षेच्या वेळापत्रकाची माहिती यूपीएससीच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. असिस्टंट कमांडंट परीक्षा ४ ऑगस्ट २०२४ रोजी देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर दोन सत्रांमध्ये घेतली जाईल.

पेपर-१ सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत घेण्यात येईल. ज्यामध्ये सामान्य क्षमता आणि बुद्धिमत्ता विषयांचे प्रश्न विचारले जातील. याशिवाय पेपर-२ दुपारी २ ते ४ या वेळेत घेण्यात येईल. पेपर- २ मध्ये सामान्य अध्ययन, निबंध आणि आकलन या विषयांचे प्रश्न येतील.

Central Armed Police Force
Entrance Exam| बीबीए, बीसीए, बीएमएस सीईटीसाठी आजपासून करा अर्ज

या भरतीसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना परीक्षेच्या तारखेच्या काही दिवस आधी परीक्षेला बसण्यासाठी प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाईल. प्रवेशपत्र उपलब्ध होताच उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन तपशील भरून ते ऑनलाइन मोडद्वारे डाऊनलोड करू शकतील.

या भरतीद्वारे एकूण ५०६ रिक्त पदांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये बीएसएफमध्ये १८६, सीआरपीएफमध्ये १२०, सीआयएसएफमध्ये १००, आयटीबीपीमध्ये ५८ आणि एसएसबीमध्ये ४२ पदांची भरती केली जाणार आहे. भरतीशी संबंधित तपशीलवार तपशील मिळविण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news