Espionage Case: काश्मीरमध्ये 'राझी'सारखी घटना; ChatGPT- क्लॉडसारखे टूल्स वापरुन हेरगिरी; लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीला अटक

Jammu Todays News: जम्मूमध्ये लष्करातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीविरोधात हेरगिरीच्या आरोपांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Espionage Case
Espionage CasePudhari
Published on: 
Updated on: 

Jammu kashmir Espionage Case News

श्रीनगर : जम्मूमध्ये लष्करातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीविरोधात हेरगिरीच्या आरोपांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेने चॅटजीपीटी आणि क्लॉड यांसारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) टूल्सच्या मदतीने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील विषयांवर संशोधनपर नोट्स तयार केल्याचा आरोप आहे.

Espionage Case
Jammu Kashmir News: गोळ्या झाडूनही स्कॉर्पिओ थांबली नाही...; जम्मू-श्रीनगर हायवेवर सुरक्षा यंत्रणांची धावपळ; हाय अलर्ट जारी

हे दस्तावेज चीनी गुप्तचर यंत्रणांशी संबंधित व्यक्तींसाठी तयार करण्यात आले होते का, याचा तपास यंत्रणा करत आहेत. तेलंगणातील रहिवासी ही महिला फ्रीलान्स संशोधक होती. तिने आंतरराष्ट्रीय संबंध आणि जागतिक प्रशासन या विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, संयुक्त राष्ट्रांही इंटर्नशिप केली होती.

Espionage Case
Vande Bharat : रेल्वेच्या इतिहासात नव्या अध्यायाचा प्रारंभ; जम्मू-श्रीनगर वंदे भारत धावली!

तिला नियंत्रण रेघेवरील परिस्थिती, अरुणाचल प्रदेशातील महत्त्वाचे पायाभूत प्रकल्प आणि ड्रोन तैनातीसारख्या विषयांवर पेपर तयार करण्याचे काम दिले जात असल्याचा दावा आहे. १४ ऑक्टोबरला गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांनी महिलेला जम्मू तवी रेल्वे स्थानकावर रोखले. ती पठाणकोटकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढणार होती. चौकशीसाठी तिला जवळच्या लष्करी ठिकाणी नेण्यात आले.

माहिती गुल्दस्यात

पोलिसांनी सध्या या प्रकरणातील जप्त साहित्य, विदेशी संपर्काची ओळख व शोध मोहिमेबद्दलची माहिती उघड केलेली नाही. महिलेची विदेशी संपर्काशी कशी ओळख झाली, संभाषण कधी सुरू झाले आणि कोणत्या पातळीपर्यंत माहितीची देवाणघेवाण झाली, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत.

बौद्धिक जाळ्याची शिकार

ही महिला बौद्धिक जाळ्याची शिकार ठरल्याची शक्यता आहे. म्हणजे ज्यांना ती शैक्षणिक किंवा संशोधन जगतातील समझायची, ते प्रत्यक्षात कथितरीत्या संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणारे गुप्तहेर होते. तथापि, सामायिक केली गेलेली कागदपत्रे, माहिती आणि सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news