Election Commission : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, सहा राज्यांतील 'SIR'ला मुदतवाढ
सहा राज्यातील मतदार यादी अद्ययावत होणार
आवश्यक प्रमाणात दावे आणि आक्षेप प्राप्त न झालेल्यांना दिलासा
विशेष मतदार यादी सुधारणा मोहिम (SIR) २०२६ अंतर्गत अर्ज आणि कागदपत्रे सादर करण्यास मुदतवाढ
Election Commission Extends SIR Deadline
विशेष मतदार यादी सुधारणा मोहिम (SIR) २०२६ अंतर्गत अर्ज आणि कागदपत्रे सादर करण्याची अंतिम मुदत केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) एका आठवड्याने वाढवली आहे. सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आवश्यक प्रमाणात दावे आणि आक्षेप प्राप्त झाले नाहीत, त्यांना हा दिलासा देण्यात आला आहे.वाढवी मुदतीचा नागरिकांना होणार लाभ
वाढवी मुदतीचा नागरिकांना होणार लाभ
आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडू आणि गुजरात या राज्यांमध्ये एसआयआर सादर करण्याची नवीन अंतिम तारीख आता १९ डिसेंबर २०२५ ) ऐवजी २४ डिसेंबर २०२५ असेल. त्याचप्रमाणे, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आणि अंदमान आणि निकोबारसाठी अंतिम मुदत १८ डिसेंबर २०२५ (गुरुवार) वरून वाढवून २३ डिसेंबर २०२५ (मंगळवार) करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील (यूपी) एसआयआरची अंतिम तारीख २६ डिसेंबर २०२५ वरून वाढवून ३१ डिसेंबर २०२५ (बुधवार) करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने या सर्व राज्यांतील नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी वाढलेल्या मुदतीचा लाभ घेत आपली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत.
मतदार यादी तपासणी अद्ययावत करण्याचा उपक्रम
SIR हा केंद्रीय निवडणूक आयोगद्वारे आयोजित केलेला उपक्रम आहे. यामध्ये मतदार यादीची कसून तपासणी आणि अद्ययावत करण्याचे काम केले जाते.मतदार यादीमध्ये पात्र असलेल्या सर्व नागरिकांचा समावेश आहे की नाही, आणि अपात्र व्यक्तींचे (उदा. मृत, स्थलांतरित किंवा एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणी केलेले) नाव वगळले गेले आहे की नाही, हे सुनिश्चित करणे. या प्रक्रियेत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची प्रत्यक्ष पडताळणी करतात. : मतदार यादीतील जुन्या त्रुटी दूर करण्यासाठी, स्थलांतर आणि लोकसंख्या वाढीमुळे झालेले बदल नोंदवण्यासाठी आणि यादीची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी हा विशेष उपक्रम हाती घेतला जातो.आता याला मुदतवाढ मिळाल्याने नागरिकांना याचा लाभ होणार आहे.

