

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत-पाकिस्तानमध्ये तणाव सुरू असताना निसर्गाही पाकिस्तानवर कोपला आहे. पाकिस्तानमध्ये शनिवारी (दि.९) रात्री उशिरा अचानक भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४ इतकी नोंदवली जात आहे. एजन्सीकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने म्हटले आहे की भूकंप रात्री उशिरा १:४४ वाजता झाला.
भारत- पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती सुरू असून भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्यूतर देत पाकिस्तानचा डाव हाणून पाडला आहे. यादरम्यान शनिवारी मध्यरात्री पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा शहराजवळ भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.० इतकी असून भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर तेथील लोक घाबरून घराबाहेर पडले. यामध्ये कोणतीही जीवीतहानी अथवा वित्तहानी झाली नाही.