E-Rickshaws Kill Switch Video: 'गंमत मधी' धावत्या ई-रिक्षा खटक्यावर बंद... बॅटरीच्या 'किल स्विच'मुळं गरीबांच्या पोटावर पाय

E-Rickshaws Kill Switch Video
E-Rickshaws Kill Switch Videopudhari
Published on
Updated on

Battery Management App Controversy: सोशल मीडियावर एक प्रँक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. जरी हा प्रँक व्हिडिओ असला तरी ज्या प्रकारे यात रस्त्यावरून धावत असलेल्या ई-रिक्षा खटक्यावर बंद केल्या जात आहेत ते पाहून ही धोक्याची घंटा आहे अशी चर्चा जोर धरू लागली आहे. आता या ई-रिक्षाचा किल स्विच दाबून त्याचा व्हिडिओ करण्याऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे सर्व इन्स्टाग्रामवर लाखो हजारो व्ह्युजसाठी केलं जात आहे.

E-Rickshaws Kill Switch Video
CBSE Controversy | ‘सीबीएसई‌’चा सावळागोंधळ

यामध्ये BAT-BMS आणि Lossigy या अॅप्सचा वापर केला जात आहे. हे अॅप्स भारतात विकल्या जाणाऱ्या सुरक्षित नसलेल्या लिथियम आयर्न बॅटरी पॅक्समधील कच्चा दुवा शोधून त्या नियंत्रित करत आहेत. बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम ब्लुटूथद्वारे कनेक्ट केली जाते आणि त्याला कोणताही पासवर्ड प्रोटेक्शन नाहीये. त्यामुळं जवळचा स्मार्टफोन वापरून एकप्रकारे या बॅटरी किल स्वीच तयार केला जात आहे.

याबाबतचा प्रयोग हिंदूस्तान टाईम्सने केला असून आधी गुगल प्ले स्टोअर वरून Lossigy हे अॅप डाऊनलोड करण्यात आलं. त्यानंतर जवळच्या ई - रिक्षाची बॅटरी एका क्लिकवर डिसेबल करण्यात आली. ही बॅटरी पुन्हा सुरू करण्याचा स्विच हा फक्त त्या अॅपमध्येच होता. त्यामुळं रिक्षा चालक किंवा मालक यांच्या हातात काही उरत नाही.

E-Rickshaws Kill Switch Video
Nisarg Adhikari | CBSE पोर्टल हॅक करणाऱ्या १९ वर्षांच्या 'निसर्ग'च्‍या कौशल्याने तज्ज्ञ थक्क; IIT कानपूरमध्ये मिळाली नोकरी!

दरम्यान, ई-रिक्षा चालकांनी ही समस्या आम्ही अनेक महिन्यांपासून भोगत असून मात्र आता ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. व्हायरल रीलसाठी हे केलं जात आहे. जाणकारांच्या मते स्वस्त किंमतीत मिळणाऱ्या वस्तू तुमच्यासाठी कशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर तांत्रिक धोका निर्माण करू शकतात याचं हे उदारहण आहे असं मत व्यक्त करत आहेत.

E-Rickshaws Kill Switch Video
CBSE त्रि-भाषा सूत्राला अंतरिम स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

चारू राजक यांनी सांगितलं की ते Okhla ची ई-रिक्षा चालवतात. पाच महिन्यापूर्वी पहिल्यांदा अचानक माझी रिक्षा बंद पडली होती. मात्र एका दिवसात जवळपास १२ वेळी अशाच प्रकारे माझी रिक्षा बंद पडली. मला भीती वाटत होती की भर ट्रॅफिकमध्ये कोणीतरी माझ्या रिक्षाला येऊन धडकेल.

राजक हे रिक्षा मालक असल्याने आणि त्याच्या डिलरने त्याला या अॅपबद्दल माहिती देत बंद पडलेली बॅटरी कशी सुरू करायची हे सांगितल्यावर त्याच्या जिवात जीव आला. मात्र त्याने सांगितलं की ते ४५० रूपये प्रतिदिवस अशी रिक्षा भाड्याने देखील देतात. त्या गरीब लोकांकडे ना स्मार्टफोन असतो ना याबाबतचं काही ज्ञान असतं त्यांचा प्रचंड खोळंबा होतो.

E-Rickshaws Kill Switch Video
CBSE OSM Controversy | "मी पूर्ण जबाबदारी घेतो.." : CBSE OSM वादावर केंद्रीय शिक्षण मंत्री नेमकं काय म्‍हणाले?

दरम्यान, उत्तर प्रदेशातील इ-रिक्षा निर्माते बलविंदर सिंग साहनी यांनी सांगितलं की, बॅटरी सिस्टम पासवर्ड आधारित तयार करण्यात आलेले नाहीत. त्यावेळी कोणालाही सुरक्षेच्या या कमतरतेचा कोणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गैरफायदा उचलेल असं वाटलं नव्हतं. सर्व्हिस इंजिनिअर द्वारे ही बॅटरी अॅक्सेस केला जाईल असं तिचं डिझाईन केलं गेलं होतं. त्यामुळंच त्याला पासवर्ड प्रोटेक्शन देण्याचा प्रश्नच नव्हता.' साहनी यांनी जवळपास १५ हजारापेक्षा जास्त ई- रिक्षाचे युनिट विकले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news