IndiGo flight news: मद्यधुंद प्रवाशाचा इंडिगोच्या विमानात धिंगाणा, केबिन क्रूशी गैरवर्तन, पुढे काय झालं?

दिल्लीहून कोलकात्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका प्रवाशाने केबिन क्रूशी गैरवर्तन करत धिंगाणा घातल्याची घटना घडली.
IndiGo flight drunk passenger cabin crew misbehavior
IndiGo flight drunk passenger cabin crew misbehaviorfile photo
Published on
Updated on

IndiGo flight news

दिल्ली : दिल्लीहून कोलकात्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात १ सप्टेंबर रोजी एका प्रवाशाने केबिन क्रूशी गैरवर्तन करत सहप्रवाशांना त्रास दिल्याची घटना घडली. विमानतळावर पोहोचताच संबंधित प्रवाशाला सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं, अशी माहिती इंडिगोकडून देण्यात आली आहे.

प्रवाशी मद्याच्या नशेत होता आणि त्याला विमान वाहतूक नियमांनुसार “अनियंत्रित” घोषित करण्यात आलं. कोलकात्यात उतरल्यानंतर त्याच्यावर संबंधित अधिकाऱ्यांकडे औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. इंडिगोच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, “१ सप्टेंबर २०२५ रोजी दिल्ली-कोलकाता मार्गावर असलेल्या इंडिगो 6E 6571 विमानप्रवासात एका प्रवाशाने मद्याच्या नशेत केबिन क्रूशी गैरवर्तन केलं आणि इतर प्रवाशांना त्रास दिला. त्याला अनियंत्रित घोषित करण्यात आले आणि विमान कोलकात्याला पोहोचल्यावर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले." इंडिगोने स्पष्ट केलं की, "आम्ही कोणत्याही प्रकारच्या विघातक किंवा गैरवर्तनाबद्दल 'शून्य-सहनशीलता' धोरण राखतो आणि सर्व ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."

खराब हवामानामुळे लेहला जाणारी विमानसेवा विस्कळीत

लेहमधील खराब हवामानामुळे या प्रदेशातील विमानसेवा विस्कळीत झाल्यानंतर दिल्ली विमानतळाने आज (दि. ३) प्रवाशांसाठी सूचना जारी केली. "लेहमधील खराब हवामानामुळे, विमानसेवा विस्कळीत झाली आहे. प्रवाशांना मदत करण्यासाठी आणि गैरसोय कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. विमान उड्डाण माहितीसाठी एअरलाइनशी संपर्क साधा," असे सोशल मीडियावर दिल्ली विमानतळाने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news