नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राहुल गांधी यांना पंतप्रधान पदावर बसविण्याचे स्वप्न अपूर्ण आहे, अशी खंत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षं नाना पटोले यांनी शनिवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार आणण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी केली असली तरीही राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी बसविण्याचे स्वप्न अजुनही अपूर्ण आहे. काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत महाराष्ट्राच्या कामगिरीविषयी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.