कोलकाता : वृत्तसंस्था
कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेचे कुटुंबीय नजरकैदेत असल्याचा दावा काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला. ते म्हणाले की, प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवले आहे. त्यांना घराबाहेर पडू दिले जात नाही. (Kolkata Doctor Case)
पीडितेच्या कुटुंबीयांना पोलिसांनी पैसेही देऊ केले होते, त्यामुळे ते त्यांच्या मुलीचे अंतिम संस्कार लवकर करू शकतील. हे सर्व राज्य सरकारच्या आदेशानंतर करण्यात आले. तृणमूल काँग्रेसकडून दावा केला जात आहे, याप्रकरणी सीबीआय काहीच करत नाही, असे सांगून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बोलून आपली जबाबदारी टाळत आहेत. मी त्यांना सांगतो की, सीबीआयला सहकार्य करून त्यातील त्रुटी निदर्शनास आणून देणे ही पश्चिम बंगाल सरकार आणि पोलिसांची जबाबदारी आहे. या प्रकरणाच्या तपासाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.