Crime News: लग्नाआधीच ‘ती’ अट; होणाऱ्या डॉक्टर पतीच्या निर्लज्ज मागणीने तरुणी हादरली; पोलीस ठाण्यातच रडली

Matrimonial site fraud case: मॅट्रिमोनियल साईटवरून ओळख करून घेत लग्नाचे आमिष दाखवले आणि त्यानंतर अश्लील अटी घालत तरुणीचा छळ केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
Crime News
Crime Newsfile photo
Published on
Updated on

Matrimonial site fraud case:

आग्रा: मॅट्रिमोनियल साईटवरून ओळख करून घेत लग्नाचे आमिष दाखवले आणि त्यानंतर अश्लील अटी घालत तरुणीचा छळ केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्लीतील एका कथित डॉक्टरने लग्नापूर्वी हॉटेलमध्ये शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. या मागणीला तरुणीने नकार देताच, त्याने तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आग्रा येथील ट्रान्स यमुना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
High Court: शारीरिक संबंधानंतर कुंडली जुळत नाही म्हणून लग्न मोडणे गुन्हा: उच्च न्यायालय

नेमकी घटना काय?

आग्र्यातील टेडी बगिया परिसरात राहणाऱ्या पीडित तरुणीने 'शादी डॉट कॉम' आणि 'जाटव समाज शादी मंच' या संकेतस्थळांवर आपली माहिती नोंदवली होती. याद्वारे तिची ओळख दिल्लीच्या पालम कॉलनीतील डॉ. संत गौरव नावाच्या व्यक्तीशी झाली. त्याने स्वतःला सरकारी डॉक्टर असल्याचे सांगितले होते. सुरुवातीला फोन, व्हॉट्सॲप आणि व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्यात संवाद सुरू झाला आणि दोन्ही बाजूंनी लग्नासाठी संमती दर्शवण्यात आली.

विवाहाच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग

काही महिन्यांनी जेव्हा लग्नाची बोलणी पुढे सरकली, तेव्हा आरोपी डॉक्टरचे खरे रूप समोर आले. त्याने लग्नापूर्वी तीन दिवस हॉटेलमध्ये सोबत राहण्याची आणि शारीरिक संबंध ठेवण्याची अट घातली. तरुणीने याला स्पष्ट नकार दिला असता, त्याने अश्लील चॅटिंग आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

इतकेच नव्हे तर, "मी लग्न करणार नाही, तुला विनालग्नाचे सोबत ठेवून तुझा खर्च उचलेन," असे म्हणत त्याने तरुणीचा अपमान केला. आपली राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात मोठी ओळख असल्याचे सांगत त्याने तरुणीला कुठेही लग्न करू न देण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Crime News
Crime News: धक्कादायक! तरुणीवर धावत्या व्हॅनमध्ये ३ तास लैंगिक अत्याचार, नंतर नराधमांनी गाडीतून रस्त्यावर फेकले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news