कौतुकास्पद! विद्यार्थिनींच्या यशाचं अनोखं बक्षीस! मुख्याध्यापकांनी 1 लाख खर्च करून घडवली हेलिकॉप्टर राईड

परीक्षेतील यशाचे काय बक्षीस हवे, तिघी म्हणाल्या हेलिकॉप्टरमधून फिरायचंय...
principal fulfilled the dream of three government school students
कौतुकास्पद! विद्यार्थिनींच्या यशाचं अनोखं बक्षीस! मुख्याध्यापकांनी 1 लाख खर्च करून घडवली हेलिकॉप्टर राईडfile photo
Published on
Updated on

didwana kuchaman the principal fulfilled the dream of three government school students arranged for a helicopter ride with his own money

पुढारी ऑनलाईन

समाजात आई-वडिलांप्रमाणेच शिक्षकांनाही तितकेच महत्‍वाचे स्थान आहे. शिक्षक फक्त विद्यार्थी घडवत नाहीत तर उद्याच्या सशक्त समाजाचे सुजान आणि आदर्श नागरिक घडविण्याचे काम करतात. अशाच एका मुख्याद्यापकांची विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चाललेली धडपड एका प्रसंगातून समोर आली आहे.

राजस्थानमधील डीडवाना–कुचामन जिल्ह्यातील केराप गावातील राजकीय महात्मा गांधी शाळेतील तीन विद्यार्थिनींशी संबंधित हा प्रेरणादायी प्रसंग आहे. या तिन्ही विद्यार्थिनींनी बोर्ड परीक्षेपूर्वी झालेल्या वर्ग चाचणीत उत्कृष्ट कामगिरी केली आणि अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला.

principal fulfilled the dream of three government school students
'हा' चित्रपट माझे सारे पाप धुवून टाकेल’ राम गोपाल वर्मांनी कोणत्‍या चित्रपटाची केली घोषणा?

शाळेत जेव्हा त्यांना विचारण्यात आले की बक्षीस म्हणून तुम्हाला काय हवे आहे, तेव्हा त्यांनी हसत-हसत सांगितले की त्यांना हेलिकॉप्टरमध्ये बसून फिरायचे आहे.

मात्र शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र ढाका यांनी मुलींचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला. त्यांनी स्वतःच्या पैशांतून हेलिकॉप्टरची व्यवस्था करून या मुलींना जयपूरची सैर घडवली. या संपूर्ण प्रवासासाठी सुमारे एक लाख रुपयांचा खर्च झाला, जो त्यांनी स्वतःच्या खिशातून केला.

या विद्यार्थिनींची नावे खुशी मेघवाल, रंजना नायक आणि ज्योती अशी आहेत. या तिघीही आठवीच्या वर्गात शिकतात. बोर्ड परीक्षेपूर्वी झालेल्या चाचणीत त्यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला होता.

principal fulfilled the dream of three government school students
पुसद प्रकल्पात 'पुढारी टॅलेंट सर्च' परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्याध्यापक राजेंद्र ढाका यांनी सांगितले की, मुलींना हेलिकॉप्टरची सैर घडवण्यामागचा उद्देश इतर विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळावे हा आहे, जेणेकरून तेही चांगले गुण मिळवण्यासाठी प्रेरित होतील आणि अभ्यासात पुढे जातील.

दरम्यान, हेलिकॉप्टरमध्ये सैर करणारी विद्यार्थिनी ज्योती हिने सांगितले की, “आम्हाला जेव्हा कळले की आम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसणार आहोत, तेव्हा सुरुवातीला वाटले सर चेष्टा करत आहेत. पण प्रत्यक्षात हेलिकॉप्टरमध्ये बसून फिरल्यानंतर आमचे स्वप्न पूर्ण झाले.” इतर दोन्ही विद्यार्थिनींनीही हेलिकॉप्टरमध्ये बसल्याचा आनंद व्यक्त केला. या मुख्याध्यापकांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news