CJP Jantar Mantar Protest: २० जुलै तर ट्रेलर... सरकारनं ऐकलं नाही तर 'शांत' बसणार नाही; CJP प्रवक्ता रांका यांनी दिला इशारा

CJP Jantar Mantar Protest
CJP Jantar Mantar Protestpudhari
Published on
Updated on

CJP Jantar Mantar Protest: कॉक्रोज जतना पार्टीने २० जुलै रोजी झालेल्या संसदेवरील मोर्चानंतर आपला बेस जंतर मंतरवर हलवला आहे. पार्टीकडून अजून आंदोलन सुरू असून जर आमच्या तीन मागण्या मान्य झाल्या नाहीत तर अजून मोठं आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याचबरोबर त्यांनी ते जेलमध्ये जाण्यास घाबरत नाहीत. ते पहिल्या दिवसांपासून युएपीए आणि एनएसए अंतर्गत जेलमध्ये जाण्यास तयार आहेत असं देखील सांगितलं.

CJP Jantar Mantar Protest
CJP Protest Delhi: CJP संसद मोर्चाप्रकरणी मोठी कारवाई! 10 FIR दाखल; दिल्लीत सुरक्षा वाढली, बंगालमधून 2 हजार CRPF जवान रवाना

ाकॉक्रोज जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितलं की, 'भारताच्या स्वातंत्र्यानंतरचे हे सर्वात मोठे आंदोलन आहे. आम्ही अगदी स्पष्टपणे सांगतोय की जे काही २० जुलैला झालं ते फक्त ट्रेलर होते. जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर लाखो तरूण दिल्लीत येतील. त्यावेळी आम्ही मागे हटणार नाही शांत राहणार नाही. सरकारला लवकरच काहीतरी करावं लागेल नाहीतर देशातील तरूण त्यांना खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत.'

CJP Jantar Mantar Protest
CJP Protest : विद्यार्थी, युवकांवरील लाठीचार्जचे फोटो-व्हिडिओ पाठवा : 'तृणमूल'च्या साकेत गोखलेंचे आवाहन

रांका पुढे म्हणाले, 'आमच्याविरूद्ध आम्ही शांततेत आंदोलन करत नाहीये असा प्रचार करत आहेत. २० जुलैचा मार्च शांततेतच होतं. ज्यावेळी पोलिसांनी क्रूरपणे लाठीचार्ज केला त्यानंतर विद्यार्थी चिडले. गेल्या ३१ दिवसांपासून हा तरूण शांततेत इथं बसलाय. आम्ही गांधीजी आणि अंबेडकर यांची तत्वे पाळत आहोत.'

कॉक्रोज जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी त्यांच्या मागण्यांबाबत सांगितलं. ते म्हणाले, 'आम्ही आमच्या मागण्या स्पष्टपणे ठेवल्या आहेत. अभिजीत दिपके देखील याबाबत स्पष्ट बोलला आहे. आम्ही कोणत्याही आंदोलकावर एफआयआर आणि भविष्यातील एफआयआर होऊ देणार नाही. त्याशिवाय हे आंदोलन संपणारच नाहीये. नेतृत्वाचा जिथे विषय येतो तिथं आम्ही कोणथ्याही एफआयआरला घाबरत नाही.'

CJP Jantar Mantar Protest
Bachchu Kadu on CJP Protest : आंदोलन देशाचा आत्मा, आंदोलकांना दहशतवादी म्हणणे चुकीचे’ : बच्चू कडूंनी सदाभाऊ खोतांना सुनावले

'आम्ही युएपीए आणि एएसए अंतर्गत अटक होण्यास पहिल्या दिवसापासूनच तयार आहोत. जेलमध्ये जाणं हे या आंदोलनाची छोटीशी किंमत आहे. या आंदोलनावेळी कोणत्याही पक्षाने मग तो बीजेपी का असेना एकत्र या कारण ही एक मोठी चळवळ आहे आणि योग्य रास्त मागणी आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news