Ukraine Russia war : युक्रेनचा रशियाच्या क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्यावर हल्ला; ८०० हून अधिक ड्रोन डागले, ६ जणांचा मृत्यू

लष्करी धावपट्टीवर थेट निशाणा केल्‍याचाही दावा
Russia Ukrain drone war | Putin | Zelenskyy
Russia Ukrain drone war | Putin | Zelenskyyfile Photo
Published on
Updated on

Ukraine Russia drone attack : युक्रेनने रशियाविरोधात युद्ध सुरू झाल्यापासूनचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला चढवला आहे. युक्रेनच्या सैन्याने रशियन रॉकेट सेंटर आणि एका लष्करी धावपट्टीला (एअरबेस) लक्ष्य केल्याचा दावा केला आहे.

क्षेपणास्त्र निर्मितीचा मुख्य कारखाना उद्ध्वस्त

युक्रेनने केलेल्या या भीषण हल्ल्यात रोस्तोव भागातील क्षेपणास्त्रे आणि रॉकेटसाठी घन इंधन (सॉलिड फ्युएल) तयार करणारा मुख्य कारखाना उद्ध्वस्त झाला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी रात्रभरात ८२२ युक्रेनियन ड्रोन नष्ट केले, ज्यातील ६०० हून अधिक ड्रोनचा रोख राजधानी मॉस्कोच्या दिशेने होता.

६ जणांचा मृत्यू

या हल्ल्यात रोस्तोव आणि मॉस्को परिसरात किमान ६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. युक्रेनियन सैन्याने टेलिग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, "ही कंपनी मल्टिपल लाँच रॉकेट सिस्टीमसह विविध प्रकारच्या क्षेपणास्त्र प्रणाली आणि हवेत मारा करणाऱ्या शस्त्रास्त्रांसाठी सॉलिड रॉकेट प्रोपेलेंट (घन इंधन) बनवते."

Russia Ukrain drone war | Putin | Zelenskyy
Pan Masala ad Controversy : शाहरुख खान, अजय देवगणसह टायगर श्रॉफला तुकाराम मुंडेंची नोटीस, नेमकं कारण काय?

तीन शहरांवर हल्‍ला

संबंधित भागाच्या राज्यपालांनी युक्रेनियन क्षेपणास्त्राने एका औद्योगिक युनिटला लक्ष्य केल्याचे सांगितले आहे. स्थानिक राज्यपाल युरी स्ल्यूसार यांनी माहिती दिली की, रशियाच्या नैऋत्येकडील रोस्तोव भागात तीन शहरांवर झालेल्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर मॉस्को परिसरात एक युक्रेनियन ड्रोन एका खाजगी घरावर आदळल्याने ८३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.

Russia Ukrain drone war | Putin | Zelenskyy
ICC WTC Points Table : ऑस्‍ट्रेलियामध्‍ये बांगलादेशचा विजय ! WTCच्या शर्यतीत रंगत; टीम इंडियाची स्थिती काय?

लष्करी धावपट्टीवर थेट निशाणा

युक्रेनियन सैन्याने रशियातील 'निजनी' येथील लष्करी एअरबेसला लक्ष्य करून त्याचे मोठे नुकसान केले आहे. याच एअरबेसवरून रशियन लढाऊ विमाने उड्डाण करून युक्रेनवर हल्ले करत असत. युक्रेनने दावा केला आहे की, या हल्ल्यांमुळे रशियाच्या दोन्ही ठिकाणांना भीषण आग लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news