Girl Climbs Tower : ‘मला बॉयफ्रेंडसोबत राहायचंय...’ हट्टी तरूणी मोबाइल टॉवरवर चढली; पोलिसांनी काय केले पहा..

किशोरीची ओळख आणि तिची परिस्थिती समजून घेण्यासाठी पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली.
Girl Climbs Tower
Girl Climbs Tower : ‘मला बॉयफ्रेंडसोबत राहायचंय...’ हट्टी तरूणी मोबाइल टॉवरवर चढली; पोलिसांनी काय केले पहा..file photo
Published on
Updated on

deoria girl climbs mobile tower demands marriage with boyfriend police rescue

पुढारी ऑनलाईन : सध्याच्या दिवसात तरूणांमध्ये हट्टापायी टोकाचे पाउल उचलण्याचे प्रकार वाढलेले दिसून येतात. अशाच एका हट्टातून आणि प्रेमप्रकरणातून एका तरूणीने भलतेच पाउल उचलले कोणते ते पहा..

Girl Climbs Tower
Death of Twins : फरशीवर सांडलेले केमिकल जुळ्या भावांनी चाटले अन् होत्याच नव्हत झालं

उत्तर प्रदेशातील देवरिया येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमीसोबत लग्न करण्याच्या हट्टापायी एका किशोरीने थेट मोबाइल टॉवरवर चढून गोंधळ उडवला. तब्बल दोन ते अडीच तास पोलिसांकडून तिला खाली उतरवण्याचे प्रयत्‍न सुरू होते.

देवरिया जिल्ह्यातील लार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. शुक्रवारी दुपारी पटनेजी परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या मोबाइल टॉवरवर एक किशोरी चढली. पाहता पाहता ती टॉवरच्या बर्‍याच उंचीवर पोहोचली. खाली उपस्थित असलेल्या नागरिकांचे लक्ष तिच्याकडे गेले आणि परिसरात मोठी गर्दी जमली.

घटनेची माहिती मिळताच लार पोलीस ठाण्याचे प्रभारी राकेश सिंह पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, किशोरी टॉवरच्या अत्यंत उंच भागात असल्याने तिला खाली उतरवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. किशोरीने आपला चेहराही झाकला होता. त्यामुळे तिची ओळख पटवण्यातही अडचणी येत होत्या.

Girl Climbs Tower
Cooking Oil : ४ जणांचे कुटुंब? महिन्याला फक्त इतकंच तेल मागवा; जास्त तेल ठरू शकतं धोकादायक!

ड्रोनच्या मदतीने घेतला परिस्थितीचा अंदाज

किशोरीची ओळख आणि तिची परिस्थिती समजून घेण्यासाठी पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली. त्यानंतर पोलिसांनी लाउडस्पीकर आणि माइकची व्यवस्था केली. माइकच्या माध्यमातून किशोरीशी संवाद साधत तिला खाली येण्याची विनंती करण्यात आली.

मात्र, किशोरी आपल्या प्रेमीसोबत लग्न करण्याच्या मागणीवर ठाम होती. पोलिसांनी तिला तिचे म्हणणे ऐकून घेतले जाईल आणि संबंधित प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. जवळपास दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर पोलिसांना तिला समजावण्यात यश आले.

‘मला त्याच्यासोबतच लग्न करायचंय’

टॉवरवरून सुरक्षितपणे खाली आल्यानंतर किशोरीने पोलिसांना सांगितले की, ती मईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील तरुणावर प्रेम करते आणि त्याच्यासोबत लग्न करू इच्छिते. तिला त्याच तरुणासोबत राहायचे असल्याचेही तिने पोलिसांना सांगितले.

किशोरीने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या कुटुंबीयांनी तिच्या प्रियकराविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ३० ऑगस्ट रोजी लार पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात किशोरीचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. आता ती आपल्या प्रियकरासोबत लग्न करण्याच्या मागणीवर ठाम आहे.

पोलिसांनी काय सांगितले?

सीओ गौरव सिंह यांनी सांगितले की, ११ सप्टेंबर २०२६ रोजी लार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक युवती मोबाइल टॉवरवर चढल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने युवतीला समजावून सांगण्यात आले आणि तिला टॉवरवरून सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news