

Delivery Boy Two Wives Cheating:
महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात मुलांच्या लग्नाचा विषय गंभीर होत आहे. मुलांची लग्नच होत नसल्याची ओरड कानाकोपऱ्यातून होत असतानाच एक अजब बातमी समोर आली आहे. एका डिलिव्हरी बॉयची दोन लग्न झाली. एक पत्नी गावात होती तर दुसरी शहरात! सगळं कसं सुखासुखी सुरू होतं. मात्र चित्रपटाच्या कथानकात जसा ट्विस्ट यावा तसा ट्विस्ट या डिलिव्हरी बॉयच्या आयुष्यात आला. आता हा डिलिव्हरी बॉय जेलमध्ये आहे. मात्र या प्रकरणाची चर्चा सगळीकडं होत आहे.
रामकृष्ण दुबे उर्फ राहुल दुबे हा एक डिलिव्हरी बॉय आहे. तो प्रयागराजच्या दलापूर गावचा रहिवासी आहे. तो एका कंपनीत डिलिव्हरी बॉयच काम करतोय. कामानिमित्त त्याला घरापासून लांब रहावं लागतं. याचाच फायदा उचलून राहुलनं एक घरवाली अन् एक बाहरवाली या तत्वाला धरून दोन लग्न केली. त्यानं २०२४ ध्ये खुशबूसोबत पहिलं लग्न केलं. तर दुसरं लग्न त्यानं शिवांगी सोबत केलं. शिवांगीसोबत कुटुंबाच्या परवानगीनं अरेंज मॅरेज करण्यात आलं. त्यानं एका पत्नीला शहरात ठेवलं तर दुसऱ्या पत्नीला गावाकडील घरी ठेवलं. मात्र हा त्याचा डबल गेम फार काळ टिकला नाही.
राहुलनं नोव्हेंबर २०२४ मध्ये खुशबूसोबत प्रेम विवाह केला होता. एका महिन्यातच खुशबूला आपल्या पतीचं दुसरं लग्न झालं आहे याची माहिती मिळाली. खुशबूनं राहुलच्या फोनवर कॉल केला त्यावेळी तो कॉल दुसरी पत्नी शिवांगीनं उचलला. शिवांगीनं सांगितलं की ती राहुलची पत्नी आहे. त्यानंतर खुशबूनं राहुलसोबत आपलं लग्न झाल्याचं अन् आपण एका मुलीला जन्म दिल्याचा खुलासा केला. पुरावा म्हणून खुशबूनं शिवांगीला त्यांच्या लग्नाचे फोटो देखील पाठवले. त्यानंतर राहुलच्या आयुष्यात भूकंप आला.
दोन्ही पत्नींनी राहुलला प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. राहुलनं कुटुंबियांच्या दबावाखाली लग्न केल्याचं सांगितलं. दुसरीकडं पहिली पत्नी खुशबूनं राहुल आपल्याला सतत सोडून जाण्याची धमकी देत होता. तो मुलीला स्विकारण्यास देखील तयार नव्हता.
दोन्ही पत्नींनी धडा शिकवला
इकडं राहुलनं फसवणूक केल्यानं चिडलेल्या शिवांगीनं देखील पोलीस ठाण्यात तक्रार केली. दोन्ही पत्नींनी मिळून दोन्ही दगडांवर हात ठेवणाऱ्या राहुलला चांगलाच धडा शिकवला. पोलिसांनी आरोपी राहुलला अटक करून त्याची तुरूंगात रवानगी केली आहे.