Traders letter to Rahul Gandhi: राहुलजी नम्र विनंती... पोटावर लाथ मारू नका.. रामलीला मैदानाजवळील व्यापारांनी धाडलं पत्र

सीटीआय चेअरमन बृजेश गोयल यांनी १० हजार कोटी रूपयांचे नुकासन होण्याची व्यक्त केली भीती
Traders letter to Rahul Gandhi
Traders letter to Rahul Gandhipudhari
Published on: 
Updated on: 

Delhi traders letter to Rahul Gandhi rally: दिवाळीपूर्वी दिल्लीतील व्यापाऱ्यांनी लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांना पत्र लिहिलं आहे. चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (CTI) ने राहुल गांधी यांना पत्र लिहून रामलीला मैदानावर होणारी रॅली स्थगित करण्याची विनंती केली आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की रामलीला मैदानाच्या जवळपास २० मोठे होलसेल आणि रिटेल व्यापारी आहेत. अशा परिस्थितीत रॅली झाली तर बाजारात येण्या जाण्याचे मार्ग प्रभावित होऊ शकतो. त्यामुळे व्यापाऱ्यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकासन होण्याची शक्यता आहे.

Traders letter to Rahul Gandhi
Priyanka vs Rahul Gandhi : काँग्रेसमध्ये प्रियांका विरुद्ध राहुल वाद? भाजपचा दावा

१० नोव्हेंबरपर्यंत रॅली स्थगित करा

CTI चेअरमन बृजेश गोयल यांनी आपल्या पत्रात राहुल गांधी यांना रॅली स्थगित करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ही रॅली भाऊबीज नंतर करण्यात यावी. भाऊ बीज १० नोव्हेंबरला आहे. त्यामुळे बृजेश गोयल यांनी राहुल गांधी यांना १० नोव्हेंबर पर्यंत रॅली स्थगित करण्याची विनंती केली आहे.

Traders letter to Rahul Gandhi
Amit Shah On Rahul Gandhi: तुम्ही परदेशात का जाऊन बसलाय? एकदा दिल्लीत लँड करा.. गृहमंत्री अमित शहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

ऑक्टोबरमध्ये ३ हजार कोटीचं नुकसान

बृजेश गोयल यांनी सांगितलं की दिवाळी हा पीक सीजन असतो. त्यात जवळपास १० हजार कोटींचा व्यवसाय प्रभावित होऊ शकतो. काँग्रेसने दिल्लीत रामलीला मैदानावर १ नोव्हेंबर रोजी रॅलीची घोषणा केली आहे. त्यावरून सीटीआयने चिंता व्यक्त केली असून सीटीआय चेअरमन यांनी राहुल गांधींना पत्र लिहून ही रॅली १० नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात यावी असे विनम्र निवेदन करण्यात आले आहे.

Traders letter to Rahul Gandhi
Rahul Gandhi | गोवा बनले भ्रष्टाचाराचे मॉडल; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल

रॅलीमुळे ठप्प होणार बाजार

रामलीला मैदानाच्या ५ किलोमीटरच्या रेडिअसमध्ये दिल्लीचे प्रसिद्ध होलसेल आणि रिटेल बाजार आहेत. यात चांदनी चौक, सदर बाजार. चावडी बाजार, भागीरथ पॅलेस, खारी बावली. कश्मिरी गेट, नया बाजार, मोरी गेट, किनारी बाजार, दरीबा, दरिया गंज, अजमेरी गेट, जामा मशीद, झंडेवालान, करोल बाग, नबी करीम, आझाद मार्केट, लाजपत राय मार्केट इत्याती मार्केट आहेत. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की या बाजारातून संपूर्ण भारतात माल पाठवला जातो. जर रॅली झाली तर ट्रॅफिक वळवावं लागेल, मेट्रो स्टेशन बंद ठेवावी लागतील. अन् बॅरेकेडिंगमुळे संपूर्ण बाजारांचे कामकाज ठप्प होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news