Swine Flu: स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला: मास्क वापरण्याचे आणि गर्दी टाळण्याचे सरकारचे आवाहन

राजधानी दिल्लीत स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
Swine Flu
Swine FluFile Photo
Published on
Updated on

Delhi Swine Flu news

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने नागरिकांसाठी आरोग्य मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे आणि लक्षणे दिसताच तत्काळ वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत या वर्षात आतापर्यंत H1N1 स्वाईन फ्ल्यूचे १,७७७ हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यातच गुरुवारी एका दिवसात ११४ नव्या बाधितांची नोंद झाली. चालू वर्षात इन्फ्लूएंझा-ए च्या रुग्णांची संख्या २,३०० च्या पार गेल्याने प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.

Swine Flu
Flipkart, Amazon, Coca-Cola सह 150 कंपन्यांना FSSAI कडून नोटीस

काय काळजी घ्यावी?

  • खोकताना किंवा शिंकताना नाक आणि तोंड रुमालाने झाका.

  • साबण आणि पाण्याने वारंवार हात स्वच्छ धुवा.

  • संसर्ग झालेल्या व्यक्तींपासून सुरक्षित अंतर ठेवा आणि अनावश्यकपणे डोळे, नाक, तोंडाला स्पर्श करणे टाळा.

  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा आणि शरीरात पाण्याचे प्रमाण पुरेसे ठेवा.

  • ताप, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यास स्वतःहून औषधे न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

'ही' लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

इन्फ्लूएंझा किंवा फ्लू हा श्वसनसंस्थेचा एक संसर्गजन्य आजार आहे, ज्यात नाक, घसा, श्वासनलिका आणि वायुकोश यांवर परिणाम होतो. H1N1 या 'इन्फ्लूएंझा ए' प्रकारच्या विषाणूमुळे होणारा फ्लू म्हणजे स्वाईन फ्लू. त्याची पहिली मोठी साथ २००९ मध्ये आली होती. हा विषाणू बाधित व्यक्तीकडून खोकताना, शिंकताना, बोलताना किंवा श्वास घेताना बाहेर पडणाऱ्या तुषारांतील सूक्ष्म कणांद्वारे पसरतो. ताप, खोकला, घसा खवखवणे, अंगदुखी, डोकेदुखी किंवा श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे आढळल्यास, स्वतःहून औषधोपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन लोकांना करण्यात आले आहे.

तज्ज्ञांच्या मते, भारतात दरवर्षी जानेवारी ते मार्च आणि पावसाळ्यानंतर अशा दोन टप्प्यांत इन्फ्लूएंझाचा प्रभाव वाढतो. यंदा दिल्लीत H1N1 या प्रकारचा प्रसार अधिक दिसून येत आहे. आरोग्य विभाग दररोज परिस्थितीचा आढावा घेत असून नागरिकांनी न घाबरता योग्य खबरदारी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Swine Flu
Biological age: शरीर किती वेगाने म्हातारे होत आहे आता समजणार? वैज्ञानिकांनी तयार केले ‘PASTA’ टूल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news