Delhi Protest | दिल्लीत पोलीस मारहाणीत विद्यार्थिनीचा एक कान बधिर

Rahul Gandhi Delhi police student ear injury- राहुल गांधी यांचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप
Delhi Protest
Delhi Protest pudhari photo
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

मतदारयादी पुनरीक्षणातील कथित अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या 'एनएसयूआय' आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर दिल्ली पोलिसांनी अमानुष अत्याचार केल्याचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळे केरळममधील दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी आथिरा हिने एका कानाची ऐकण्याची क्षमता गमावली असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

Delhi Protest
Tirupati Laddu Adulteration Case: तिरुपती बालाजीच्या लाडू प्रसादातील भेसळप्रकरणी ईडीची मोठी कारवाई; १२९.८५ कोटींची मालमत्ता जप्त

राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन जखमी विद्यार्थ्यांची आपबिती माध्यमांसमोर मांडली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसद मार्ग व कॅनॉट प्लेस परिसरात आंदोलन करण्यात आले होते.

यावेळी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष अत्याचार केल्याचा आरोप आहे. मागच्या वेळी मी एका तरुणाला दाखवले होते, ज्याचा डोळा निकामी झाला होता; आता या मुलीच्या एका कानाचा पडदा फाटून तिला बहिरेपण आले आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

विद्यार्थिनी आणि कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण

आथिरा हिने सांगितले की, तिला कोणत्याही महिला पोलिसाशिवाय बसमध्ये डांबण्यात आले. महिला पोलिसाची मागणी करताच पोलिसांनी कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्याबाहेर तिच्या चेहऱ्यावर व कानावर जोरदार प्रहार केले, ज्याने तिच्या कानाची श्रवणशक्ती गेली. राहुल गांधी यांनी 'आमची शेरनी' अशी ओळख करून दिलेल्या अन्य एका महिला कार्यकर्तींन महिला कॉन्स्टेबल चंचल यादव हिने तिचे केस ओढून, गळा दाबून व चेहऱ्यावर ओरखडे ओढून मारहाण केल्याचा आरोप केला. कान टोचलेले दागिने कानात रुतून ती गंभीर जखमी झाली. १५ ते २० पोलिसांनी पोलिस ठाण्यात डांबून मारहाण केल्याचे आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मोबाईल फॉरमॅट केल्याचेही आंदोलकांनी पत्रकार परिषदेत समर नावाच्या बासरीवादकाने 'वैष्णव जन तो' हे भजन सादर करून अहिंसक प्रतिकार व्यक्त केला.

Delhi Protest
IDBI Bank - आयडीबीआय बँकेचे 'फेअरफॅक्स'ला ५२,८७८ कोटी रुपयांना हस्तांतरण

राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट निशाणा साधत म्हटले, 'अमित शहाजी, नीट बघा, हा भारताचा आवाज आहे आणि तुम्ही त्याच्याविरोधात उभे आहात. सर्व विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या गैरवर्तनाचे व्हिडीओ पुरावे सांभाळून ठेवावेत; वेळ आल्यावर दोषींवर, मग ते पंतप्रधान असोत वा कॉन्स्टेबल, कठोर कारवाई केली जाईल. या संपूर्ण प्रकरणावर दिल्ली पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

१) मतदारयादी पुनरीक्षणाविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांकडून बेदम मारहाण झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.

२) पोलिसांच्या मारहाणीमुळे दिल्ली विद्यापीठात शिकणाऱ्या आथिरा या विद्यार्थिनीचा एक कान बहिरा झाल्याचा दावा करण्यात आला.

३) महिला आंदोलक कार्यकर्त्याचे केस ओढून तसेच पोलिस ठाण्यात कपडे फाडून मारहाण केल्याचे आरोप आंदोलकांनी केले.

४) आंदोलकांनी पोलिसांच्या वर्तनाचे व्हिडीओ पुरावे जतन करावेत, दोषींवर कायदेशीर कारवाई करू, असा इशारा राहुल गांधींनी दिला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news